शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घरात घुसून ८५ वर्षीय वृद्धेचा अत्याचारानंतर खून; २४ वर्षीय तरुणास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:42 IST

ग्रामस्थांनी घरात प्रवेश करताच चोरटे आल्याचा आरोपीने केला होता बनाव

वैजापूर/लोणी खुर्द : दारू पिऊन मध्यरात्री घरात प्रवेश केलेल्या २४ वर्षीय तरूणाने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिचा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे एक ८५ वर्षीय महिला घरात एकटीच राहत होती. सोमवारी रात्री सदरील महिला घरात झोपली असताना पहाटे दोन वाजेच्या सुमारास आरोपी गुलाब आबा बेलदार (वय २४, रा. भोजे चिंचपुरे, ता. पाचोरा, जि. जळगाव) हा दारूच्या नशेत या महिलेच्या घरात शिरला. यावेळी या महिलेने आरडाओरडा केला असता आरोपीने या वृद्धेवर बलात्कार केला. त्यानंतर या महिलेचे डोके भिंतीवर आपटले. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी गुलाब याच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर त्याने साडीने या वृद्धेचा गळा आवळून खून केला. 

यावेळी शेजाऱ्यांना आवाज आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी ८५ वर्षीय महिला त्यांना मृतावस्थेत दिसून आली. यावेळी आरोपी गुलाब हा ग्रामस्थ घरात येताच घरात चोर आले होते. त्यांनीही मला मारहाण केली, ते पळून गेले, असे म्हणून लागला. ही माहिती ग्रामस्थांनी शिऊर पोलिसांना दिली. त्यानंतर सपोनि संदीप पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. सहायक पोलिस अधीक्षक महेक स्वामी यांनीही घटनास्थळी भेट दिली.

ग्रामस्थांमधील आरोपीच्या मुसक्या आवळल्याआरोपी गुलाब बेलदार मूळचा पाचोरे तालुक्यातील रहिवासी आहे. त्याची बहीण लोणी खुर्द येथे वास्तव्यास असल्याने तो दोन दिवसांपूर्वी बहिणीला भेटण्यासाठी आला होता. मयत महिलेचे घर आरोपीच्या बहिणीच्या घरासमोर असल्याने गुलाबने या वृद्धेवर नजर ठेवली होती. मंगळवारी मध्यरात्री दारूच्या नशेत आरोपीने या महिलेच्या घरात प्रवेश करून बलात्कार केला. त्यानंतर त्यांचा खून केला. पोलिस आल्यानंतर तो ग्रामस्थांमध्येच उभा होता. यावेळी ग्रामस्थांच्या जबाबानंतर पोलिसांनी संशयित म्हणून गुलाब बेलदार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपण खून केला नाही. ६ ते ७ चोरट्यांनी मलाच मारहाण केली, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. या प्रकरणी आरोपी गुलाब बेलदार याच्याविरुद्ध बलात्कार व खुनाचा शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद