शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शाहरूख खानच्या ‘जवान’ची १० मिनिटांची शूटिंग; औरंगाबादने कमविले ३० कोटी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 5, 2023 14:11 IST

‘शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ॲक्शन सीनसाठी ५० सेकंड हँड जीप खरेदी करण्यात आल्या होत्या. स्फोट घडवून अपघात घडवून आणण्यात आला.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : बाॅलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘जवान’चे चित्रीकरण (शूटिंग) बिडकीन येथील ‘डीएमआयसी’त झाले. त्यासाठी १५ दिवस ६०० जणांचे युनिट अहोरात्र कार्यरत होते. चित्रीकरण सलग १० दिवस चालले. त्यातील १० मिनिटांचे साहसी दृश्य (ॲक्शन सीन) चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबादेत ३० कोटींची उलाढाल झाली आहे.

शाहरूख खान व गौरी खान यांच्या रेड चिलीज इंटरटेन्मेंटतर्फे ‘जवान’ हिंदी चित्रपट तयार केला जात आहे. याचे चित्रीकरण २७ नोव्हेंबर ते १३ डिसेंबरदरम्यान औरंगाबादेत झाले. ॲक्शन सीनसाठी बिडकीन डीएमआयसीतील ५.५ किमीचा ८ लेनचा मोकळा रस्ता निवडण्यात आला होता. ॲक्शन सीनमध्ये स्फोटाने यात ४० सेकंडहँड जीप उडविण्यात आल्या. २० ते २५ कंटेनर, २० दुचाकी भाड्याने घेतल्या. याशिवाय ॲपेरिक्षापासून ते क्रेन, जेसीबी, रोडरोलरपर्यंत सर्व तयार ठेवण्यात आले होते. ६०० लोकांना राहण्यासाठी शहरातील २ स्ट्रार, ३ स्टार, ५ स्टार हॉटेल १५ दिवस बुक होते. पंक्चरवाल्यापासून ते २५० ते ५०० केव्ही जनरेटरपर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सेक्युरिटी गार्ड, बाउन्सरही येथीलच होते. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीपासून ते ५ स्टार हॉटेलपर्यंत सर्व खर्च मिळून १५ दिवसांत ३० कोटींपर्यंतची उलाढाल या शूटिंगमुळे झाली. एवढा मोठा खर्च केला जात होता, पण त्याचे ऑडिटही केले जात होते. चहाच्या एका कपाचेही ऑडिट केले जात होते. एवढे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.

वर्षभरात १० पेक्षा अधिक चित्रपट, वेबसिरीजचे शूटिंग२०२३ या संपूर्ण वर्षात १० पेक्षा अधिक हिंदी चित्रपट व वेबसिरीजचे शूटिंग शहरात होत असून, त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. दरम्यान, 'जवान'च्या शुटींगमुळे औरंगाबादमधील ६० कलाकारांना काम मिळाले. तसेच स्थानिक १५० बिडकीनवासियांना यातून विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला. रेड चिली प्रॉडक्शन प्रमुख धरम सोनी, एक्झिक्युटिव प्रोडूसर प्रतिक रावल, किशोर निकम, प्रॉडक्शन मॅनेजर इम्रान शेख, अक्षय अहीरराव, रज्जाक शेख, भरत साळुंके, अनिकेत पाटेकर, साद शेख यांच्या देखरेखीत हे चित्रीकरण झाले. 

हॉलिवूडच्या डायरेक्टरला भावले लोकेशनॲक्शन डायरेक्टर स्पिरो रझाटोस यांच्यासह अमेरिकेतून २५ ते ३० जणांचे पथक आले होते. सध्या बिडकीन डीएमआयसीत ८ लेनचा ५. ५ किमीचा मोकळा रस्ता चित्रपटातील विविध ॲक्शन सीनसाठी योग्य असून, येत्या काळात येथे आणखी चित्रपटांच्या शूटिंगसाठी आम्ही येऊ, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील अनेक स्थळांची माहिती जाणून घेतली, असे एट अवर्सचे संचालक किशोर निकम यांनी सांगितले.

साहसी दृश्यांसाठी ५० जीपचा अपघात‘जवान’साठी ५० जीप विकत घेऊन त्यांचा कंटेनरशी अपघात घडवून आणण्यात आला. यासाठी औरंगाबाद, जळगाव, पुणे, मुंबई येथून या सेकंडहँड जीप विकत आणण्यात आल्या होत्या. एकाही स्टंटमॅनला दुखापत झाली नाही.

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानAurangabadऔरंगाबाद