शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूरच्या यशवंत विद्यालयाच्या सृष्टीला ९९ टक्के गुण

By admin | Updated: June 18, 2014 01:42 IST

राम तत्तापुरे , अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाच्या सृष्टी करकनाळे या विद्यार्थिनीने ‘लातूर पॅटर्न’चा ठसा राज्यात उमटवित ९९ टक्के गुण मिळविले आहेत.

राम तत्तापुरे , अहमदपूर
येथील यशवंत विद्यालयाच्या सृष्टी करकनाळे या विद्यार्थिनीने ‘लातूर पॅटर्न’चा ठसा राज्यात उमटवित ९९ टक्के गुण मिळविले आहेत. शाळेने केलेल्या दाव्यात ही बोर्डात पहिली तर राज्यात दुसरी असल्याचे सांगितले जाते. परंतु याला कसलाच अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या सृष्टीने आपण आईसारखे डॉक्टर होणार असल्याचा मानस व्यक्त केला. ती त्यांच्या आई-वडिलांना एकुलती एक आहे.
लातूर पॅटर्नने एक काळ महाराष्ट्रात आपले वेगळेपण सिध्द केले. आता बोर्डाच्या निकालात लातूर बोर्ड तळाशी आहे. परंतु सृष्टी चंद्रकांत करकनाळे या मुलीने मात्र आपल्या जिल्ह्याचे नाव झळकाविले. तिने दहावीला संस्कृत, गणित, विज्ञान आणि इतिहास - भूगोल या चार विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले. तर मराठीला ९३ आणि इंग्रजीला ९५ असे गुण मिळविले आहेत. तिची आई मिनाक्षी या सुध्दा यशवंत विद्यालयाचीच विद्यार्थिनी असून त्या दहावीला बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. सृष्टीची आई मिनाक्षी अहमदपुरातच वैद्यकीय व्यवसाय करतात. तर वडील चंद्रकांत हे सिव्हील इंजिनिअर असून ते गुत्तेदार आहेत. घर सुखवस्तू असले तरी मुलांच्या शिक्षणाबाबत प्रचंड जागरुक आहे.
सृष्टी आई-वडिलांना एकुलती एक...
सृष्टीची आई मिनाक्षी आणि वडील चंद्रकांत हे जोडपे मुलीच्या यशाने हरखून गेले आहे. आपल्याला आपल्या मुलीचा अभिमान असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. सृष्टी हे एकमेव अपत्य या दाम्पत्याला असून त्यानंतर त्यांनी दुसरे मूल होऊ दिले नाही, हे विशेष. मुलगाच वंशाचा दिवा म्हणणाऱ्यांना खणखणीत चपराक देणाऱ्या या दाम्पत्यानेच जणू आमची मुलगी आपला वंश किती उत्तमपणे चालवेल, हे समाजाला दाखवून दिले.
सृष्टी म्हणते नो खासगी क्लास, ओन्ली क्रमिक पुस्तके
आपल्या यशाबाबत ‘लोकमत’शी बोलताना सृष्टी म्हणाली की मी दहावीच्या अभ्यासाचे कधीच दडपण घेतले नाही. दडपणच नव्हते त्यामुळे खासगी क्लासला कुठे गेले नाही. फक्त क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करून हे यश मिळविले असल्याचे सांगितले. आपल्या अभ्यासात मात्र मी वर्षभर सातत्य राखले. दररोज चार तास मी नित्यनियमाने अभ्यास केला. त्यावरच मला हे यश मिळविता आले. आता मी डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करणार असल्याचेही तिने ‘लोकमत’ला सांगितले.
सृष्टीने शाळेची शान वाढविली : मुख्याध्यापक शिरूरकर
आमच्या शाळेच्या मुलीने ९९ टक्के गुण मिळवून आमच्या शाळेची शान वाढविली आहे. मराठी माध्यमाची मुले कुठेही जराही कमी नसतात हेच सृष्टीने जणू दाखवून दिले. तिचे शाळेला खुप खुप कौतुक असल्याचे मुख्याध्यापक बी. यु. शिरूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.