शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ‘जलयुक्त शिवार‘च्या कामांना हवेत ९८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:16 IST

या कामांना निधीची तरतूद करण्याबाबतची संचिका अर्थ मंत्रालयात निर्णयाची वाट पाहत आहे. 

ठळक मुद्देनिधी दिला तरच घोडे पुढे सरकणार 

औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजना आता गटांगळ्या खाऊ लागली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंतच त्या योजनेची मुदत होती. त्यामुळे पुढील काळात ती योजना सुरू राहण्याबाबत साशंकता आहे. मराठवाड्यात योजनेचे शेवटच्या टप्प्यात काम सुरू असून, ठाकरे सरकारच्या स्थगिती धोरणामुळे विभागात अर्धवट असलेल्या ४ हजार २५२ कामांसाठी ९८ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी केव्हा मिळणार असा प्रश्न आहे. या कामांना निधीची तरतूद करण्याबाबतची संचिका अर्थ मंत्रालयात निर्णयाची वाट पाहत आहे. 

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी गेल्या सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू केले होते. विभागात मागील पाच वर्षांत या योजनेवर २,३३३ कोटी रुपये खर्च झाले. या खर्चात सरकारी अनुदान, लोकसहभाग, सीएसआरच्या निधीचा समावेश आहे. असे असले तरी विभागातील बहुतांश तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. विभागात सध्या योजनेचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. २ हजार ७७ कामे अपूर्ण आहेत. ज्या कामांना कार्यारंभ आदेशच मिळालेला नाही, ती कामे रद्द होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. 

मुदतवाढ मिळण्याबाबत साशंकता जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शिल्लक कामे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करावयाची होती. परंतु ती कामे पूर्ण झाली नसल्याने शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आहे. परंतु शासनस्तरावरून मुदतवाढ मिळण्याबाबत साशंकता आहे. 

मराठवाड्यातील जिल्हावार आवश्यक निधी जिल्हा    आवश्यक निधीऔरंगाबाद    ६ कोटी ३२ लाखजालना    १६ कोटी १७ लाखपरभणी    १ कोटी २५ लाखबीड    २३ कोटी ९९ लाखनांदेड    ४ कोटी ५० लाखलातूर    ४६ कोटी ३ लाखहिंगोली    अप्राप्तउस्मानाबाद    ००एकूण    ९८ कोटी ४८ लाख

टॅग्स :MarathwadaमराठवाडाJalyukt Shivarजलयुक्त शिवारfundsनिधी