शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ९५ विद्यार्थी युक्रेनमध्येच; अनेकांनी गाठली हंगेरी, पोलंड, राेमानियाची सीमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:34 IST

रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने ग्रासले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील १०९ विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले असून त्यातील १४ विद्यार्थी आतापर्यंत परतले आहेत. ९५ विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकले असून त्यातील काही जणांनी हंगेरी, रोमानिया, पोलंडच्या सीमेपर्यंत प्रवास केला आहे. विभागीय प्रशासनाकडून मंगळवारी उशिरापर्यंत एवढीच माहिती कळू शकली. अडकलेल्यांपैकी काही जण बुधवारी भारतात येतील, रात्रीपर्यंत आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकतील.

रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने ग्रासले आहे. सहा दिवसांपासून पालकांची झोप उडाली असून ते मुलांच्या संपर्कात असून ख्याली-खुशाली विचारत आहेत. युक्रेनमधील व्हिनयस्टा, युझोर्ड, ओबॅस्क, ओडेसा, किव्ह, लिव्ह, जॉर्जिया आदी ठिकाणच्या विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थी आहेत. रशियाकडून राजधानी कीव्हसह विविध ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ले होत आहेत. अनेक इमारतींचे नुकसान झाले, रस्ते खचले आहेत. त्यानंतर भारतीय मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काही मुलांनी पालकांना कळविले आहे.

लातूरचे ऋतुजा देशमाने, वेदांत शिंदे, परभणीतील संजीवकुमार इंगळे, जालन्यातील किरण भांडारी, संकेत उखर्डे, तेजस पंडित, सुयोग धनवाई, नांदेडमधील स्नेहा महाबळे, प्रशांत नरोटे, तेजस गायकवाड, संजीवनी वन्नाळीकर, सत्यम गवळी, दीपक काकडे, उस्मानाबादची केतकी कोकाटे, असे १४ जण रविवारी परतले. सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत कुणी आले नाही. बुलडाणा जिल्ह्यातील एक विद्यार्थी विमानाने औरंगाबादेत परतला.

सॉफ्टवेअर इंजिनिअरचे कुटुंब सुरक्षितमूळचे औरंगाबादचे; परंतु पुण्यात राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरसह त्यांचे चार सदस्यीय कुटुंब युक्रेनमध्ये अडकले आहे. त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. परंतु काही विद्यार्थ्यांसह ते एका फ्लॅटमध्ये असल्याची माहिती आहे.

मराठवाड्यातील युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थीऔरंगाबाद : १२जालना : ८ (४ परतले)परभणी : ६ (१ परतला)हिंगोली : ७नांदेड : ३७ (६ परतले)बीड : ३लातूर : ३१ (२ परतले)उस्मानाबाद : ५ (१ परतला)एकूण : १०९ (१४ परतले)

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा