शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

९४ वे साहित्य संमेलन ऑनलाईन अशक्य; परिस्थिती सुधारल्यास छोटेखानी सोहळा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 13:09 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांची माहिती 

ठळक मुद्देनाशिक, अंमळनेर, दिल्ली आणि विदर्भातून साहित्य संमेलन घेण्याविषयी प्रस्ताव आले आहेतअवघ्या १५ दिवसांत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यापासून सगळी तयारी करू

औरंगाबाद : साहित्य संमेलन म्हणजे लेखक आणि रसिकांचा, साहित्यप्रेमींचा मेळावा. ऑनलाईन साहित्य संमेलनाचा पर्याय सुचविणारे अनेक आहेत; परंतु पुस्तक विक्री, लेखक-वाचकांची प्रत्यक्ष भेट हे ऑनलाईन संमेलनातून शक्य नाही. त्यामुळे ९४ वे साहित्य संमेलन झाले, तर ते छोटेखानी का असेना; पण प्रत्यक्षच होईल. ऑनलाईन पद्धतीने साहित्य संमेलन होणार नाही, असा खुलासा अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

सर्वकाही सुरळीत असते तर जानेवारी २०२१ मध्ये संमेलन होणे अपेक्षित होते; परंतु कोरोनामुळे आता संमेलनाच्या आयोजनाबाबतच प्रश्नचिन्ह आहे. नवा पर्याय स्वीकारत ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या सूचना साहित्य महामंडळाकडे येत आहेत; परंतु अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी ऑनलाईनचा पर्याय अजिबातच अनुकूल नसल्याचे आणि ऑनलाईन आयोजन अर्थहीन असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले की, कोरोनामुळे लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात साहित्य संमेलन  घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन होणार नाही. साहित्य  महामंडळ डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहे. त्यानंतर परिस्थिती सुधारत आहे, असे वाटल्यास अवघ्या १५ दिवसांत साहित्य संमेलनाचे ठिकाण निश्चित करण्यापासून सगळी तयारी करू आणि साहित्य संमेलन घेऊ. जानेवारीमध्ये साहित्य संमेलन घेण्यासंबंधी विचार करण्यात येईल.

या ठिकाणांहून आले आहेत प्रस्ताव९४ वे साहित्य संमेलन झाले तर ते होणार कुठे, याविषयी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. याविषयी विचारले असता ठाले पाटील म्हणाले की, नाशिक, अंमळनेर, दिल्ली आणि विदर्भातून साहित्य संमेलन घेण्याविषयी प्रस्ताव आले आहेत; परंतु हे प्रस्ताव कोरोनाची लाट येण्यापूर्वी आलेले आहेत. आता सर्वकाही  बदलून गेले आहे. त्यामुळे आलेल्या प्रस्तावांपैकीही किती जण आता साहित्य संमेलन घेण्यास उत्सुक असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAurangabadऔरंगाबाद