शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कथा, कविता, परिसंवादाने खुलणार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:01 IST

उस्मानाबादेत ९३ व्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी, विविध कार्यक्रमांची रेलचेल

औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल असून कथा, कविता, परिसंवाद आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी हे संमेलन खुलणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

१० ते १२ जानेवारीदरम्यान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत असून, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर संमेलनाचे उद्घाटक आहेत, तसेच ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजन स्थळाला ‘संत गोरोबा काका साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले असून, शाहीर अमर शेख साहित्य मंच, सेतू माधवराव पगडी साहित्य मंच व दत्तोअप्पाजी तुळजापूरकर साहित्य मंच, असे तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. 

१० रोजी स. ९ वा. तुळजाभवानी क्रीडा संकु ल येथून ग्रंथदिंडी निघून संमेलनाची सुरुवात होईल. स. ११ वा. ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यानंतर मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. दु. ३.३० वा. तुळजापूर येथील कलावंत पारंपरिक गोंधळ सादर करणार असून, सायं. ४ ते ७ या वेळेत शाहीर अमर शेख साहित्य मंचावर संमेलनाचा उद्घाटन सोहळा  रंगेल. सायं. ७.३० ते रात्री १०.३० या वेळेत मुंबई येथील कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन, तर दत्तोअप्पाजी तुळजापूरकर मंडपात इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते कविकट्ट्याचे उद्घाटन होईल.

दि.११ रोजी शाहीर अमर शेख साहित्य मंचावर स. ९.३० वा. डॉ. दासू वैद्य आणि सारंग दर्शने लेखिका प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत घेतील. स. ११ वा. डॉ. सुषमा करोगल यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजचे भरमसाठ कवितालेखन : बाळसं की सूज’ या विषयावर परिसंवाद होईल. दु. २ वा. सतीश तराळ यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल.  याच दिवशी सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर स. ९.३० वा. शालेय विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. स. ११ वा. प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणिवा’ या विषयावर, तर दु. २ वा. श्रीराम शिधये यांच्या अध्यक्षतेखाली ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावर, सायं. ५ वा. ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजी प्रस्थ वाढते आहे’ या विषयावर ह.भ.प. राम महाराज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.

दि.१२ रोजी स. ९.३० ते १२ वा. शाहीर अमर शेख साहित्य मंचावर 'संवाद : आजच्या लक्षवेधी कथालेखकांशी', दु. २ ते ४ परिचर्चा : शेतकऱ्याचा आसूड : महात्मा फुले, याच दिवशी सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर परिसंवाद : आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक, दु. निमंत्रितांचे कविसंमेलन व दु. २ ते ५.३० वाजे दरम्यान बालकुमार मेळावा होईल. समारोप सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर सायं ५  ते ७ या वेळेत समारोप होईल. 

काही नवीन उपक्रम होणारबालाजी सुतार यांच्या वतीने सादर केला जाणारा ‘गावकथा’चा प्रयोग, म. फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचा असूड’ या ग्रंथावर अभ्यासकांची परिचर्चा आणि पाच लक्षवेधी कथाकरांशी अरविंद जगताप आणि राम जगताप यांचा प्रकट संवाद हे नवीन उपक्रम या संमेलनात होणार असल्याचे ठाले यांनी सांगितले.

स्त्री प्रकाशकाचा प्रथमच सन्मानआजवर झालेल्या साहित्य संमेलनांमधून फक्त पुरुष प्रकाशकांचाच सन्मान झाला आहे. यंदा श्रीरामपूर येथील प्रकाशक सुमती लांडे यांच्या रूपात पहिल्यांदाच एका स्त्री प्रकाशकाचा सन्मान संमेलनात होईल. 

या शोधाचे श्रेय ‘लोकमत’लासंमेलनात लक्ष्मणराव (चहावाले) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. लक्ष्मणरावांसारख्या साहित्यिकाचा शोध आम्हाला लागला, याचे संपूर्ण श्रेय ‘लोकमत’ला आहे, असे ठाले पाटील यांनी आवर्जून नमूद केले. लक्ष्मणराव हे मूळचे अमरावतीचे असून, ते मागील अनेक वर्षांपासून दिल्ली येथे राहतात. हिंदी साहित्य परिषदेसमोर त्यांचे चहाचे दुकान असून, त्यांनी चहा विक्री करता- करता तब्बल २५ पुस्तके लिहिली असून, ती लोकप्रिय ठरली आहेत. ही सर्व पुस्तके हिंदी भाषेत आहेत. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. तेथून आम्ही लक्ष्मणरावांचा शोध घेतला आणि विशेष सत्कारासाठी त्यांची निवड केली, असे ठाले पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य