शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मायबोली मराठीत ९ हजार विद्यार्थी नापास; छत्रपती संभाजीनगर विभागातील संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:37 IST

इंग्रजीपेक्षा मराठी, हिंदी विषयांत उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी जास्तच

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत विभागात तब्बल ९ हजार ४८६ विद्यार्थी मायबोली मराठी विषयात नापास झाले. तरीही इंग्रजीपेक्षा मराठी विषयांत उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी जास्तच आहे.

दहावीत ३६ विषयांमध्ये विभागात १ लाख ८३ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ७० हजार ७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १ लाख ५६ हजार २२५ विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मराठीची निवड केली होती. यातील ९३.९३ टक्के म्हणजे १ लाख ४६ हजार ७३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ९ हजार ४८६ विद्यार्थी मराठीत नापास झाले.

तर १ लाख ७३ हजार ३६६ विद्यार्थ्यांनी द्वितीय-तृतीय भाषा म्हणून इंग्रजीची निवड केली होती. यापैकी ९३.७९ टक्के म्हणजे १ लाख ६२ हजार ६०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १० हजार ७६० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.याबरोबरच १ लाख ४५ हजार हजार ७९० विद्यार्थ्यांनी द्वितीय-तृतीय भाषा म्हणून हिंदी विषयाचा पेपर दिला होता. यातील ९४.२३ टक्के म्हणजे १ लाख ३७ हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ८ हजार ४०७ विद्यार्थी नापास झाले.

विषयानुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारीविषय - टक्केवारी- मराठी प्रथम भाषा : ९३.९३ टक्के- हिंदी प्रथम भाषा : ८२.२५ टक्के- इंग्रजी प्रथम भाषा : ९८.५८ टक्के- उर्दू प्रथम भाषा : ९४.८५ टक्के- हिंदी द्वितीय-तृतीय भाषा : ९४.२३ टक्के- मराठी द्वितीय-तृतीय भाषा : ९६.२३ टक्के-इंग्रजी द्वितीय-तृतीय भाषा : ९३.७९- संस्कृत द्वितीय-तृतीय भाषा : : ९९.२३ टक्के

१६ विषयांचे विद्यार्थी १०० टक्के उत्तीर्णउर्दू द्वितीय-तृतीय भाषा, पाली, अरेबिक, फिजिओलाॅजी हायजिन अँड होम सायन्स, इलेक्ट्रिक टेक्नाॅलाॅजी, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, पाॅवर कंजुमर एनर्जी मीटर, फिजिकल ॲक्टिव्हिटी, ॲपरेल्स स्विंग मशीन ऑपरेटर, मायक्रो फायनान्स, हिंदी-उर्दू, स्टोअर ऑपरेशन असिस्टंट, असिस्टंट ब्युटी थेरपीस्ट, टुरिझम ॲण्ड हाॅस्पिटॅलिटी, ॲग्रीकल्चर आणि हेल्थ केअर या १६ विषयांचे विद्यार्थी १०० टक्के उत्तीर्ण झाले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर