शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीत कामचुकारपणा नडला; अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह ९ निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 18:56 IST

महावितरणची सध्या थकबाकी वसुली मोहीम जोरात आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणार्‍या छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने यांच्यासह एकूण ९ अधिकारी-कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

औरंगाबाद : महावितरणची सध्या थकबाकी वसुली मोहीम जोरात आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणार्‍या छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने यांच्यासह एकूण ९ अधिकारी-कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य २१ अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे, तर १५२ अधिकारी-कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, वीज ग्राहकांकडे बिलापोटी कोट्यवधी रुपयांची रक्कम थकीत असल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यामुळे महावितरणने फेब्रुवारी महिन्यापासून शून्य थकबाकी मोहीम सुरू केली आहे. 

या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी दारोदार फिरून थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करीत आहेत. जे ग्राहक प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. मात्र, या मोहिमेत कामचुकारपणा करणारे अधिकारी-कर्मचार्‍यांवर महावितरणची करडी नजर आहे. कामचुकार कर्मचार्‍यांना शिक्षा म्हणून त्यांच्या पगारातून महावितरणने ५ लाख २२ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे. 

थकबाकीदार ९० ग्राहकांना पाठीशी घातलेछावणी उपविभागांतर्गत ९० ग्राहकांकडे एक लाखाच्यावर थकबाकी आहे. या ग्राहकांकडून थकबाकी वसुलीची जबाबदारी छावणी उपविभागात कार्यरत असलेले अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने यांच्यावर सोपविण्यात आली होती. दरम्यान, माने यांनी अशा ग्राहकांकडे एक लाखाच्यावर थकबाकीची रक्कम असताना त्यांच्याकडून केवळ शंभर-दोनशे रुपये जमा करून महावितरणची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. वसुली करण्यात आलेल्या बिलाच्या तपासणीमध्ये हा सर्व प्रकार समोर आला. त्यामुळे त्यांच्यासह ९ अधिकारी-कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले असून २१ जणांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. उर्वरित १५२ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, अशा कामचुकार अधिकारी-कर्मचार्‍यांच्या  पगारातून महावितरणने ५ लाख २२ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.  

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादTaxकरMONEYपैसा