शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

9 लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा-महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज

By बापू सोळुंके | Updated: February 25, 2024 18:54 IST

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज

छत्रपती संभाजीनगर: जय बाबाजी परिवारांच्या आग्रहावरून नाशिकलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा स्वत: महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. यासोबतच छत्रपती संभाजीनगर,जालना ,अहमदनगर, दिंडोरी, शिर्डी, जळगाव आणि धुळे  या लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना जय बाबाजी परिवार पाठिंबा देणार असल्याचे शांतिगिरी महाराजांनी सांगितले. 

शांतिगरी महाराज म्हणाले की, लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा या टॅगलाईनखाली आपण पहिल्यांदा सन २००९ मध्ये आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. राजकारणात चांगली माणसे आली पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. ही भूमिका भक्तमंडळींना आवडल्याने त्यांनीच यावर्षी नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडूणक लढविण्याचा आग्रह धरला. भक्त परिवार मोठा असल्याने आपण ही निवडणूक लढविणार आणि जिंकणार आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना  दोन्ही गट हे हिंदूत्ववादी पक्ष आहेत.  या पक्षांकडेच का उमेदवारी मागत नाही अथवा तुम्ही तुमचा राजकीय पक्षच का स्थापन करीत नाही,  याप्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मोठ्या राजकीय पक्षांनीच आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी भक्तांची मागणी आहे.

पण त्यांच्या उमेदवारीची अपेक्षा न ठेवता अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच जय बाबाजी परिवार हाच आपला राजकीय पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील पंधरा वर्षात आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीसाठी चांगल्या चारित्र्यावान उमेदवारांना पाठिंबा दिला होता.यावर्षीही आपले भक्तगण जास्त असलेल्या आठ लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांवर दबाव टाकण्यासाठी तुम्ही उमेदवारी घोषित केली का असे विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला कोणावरही दबाव टाकण्याची गरज नाही, आम्ही केवळ चांगले लोक राजकारणात यावे, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे शांतिगिरी महाराज म्हणाले. या पत्रकार परिषदेला जय बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमजयबाबाजी भक्त परिवाराच्यावतीने रविवारी शहरातील संत एकनाथ रंगमंदीरात  जिल्ह्यातील भक्तांना निवडणूकींच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्वत: शांतिगिरी महाराज यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादNashikनाशिक