शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात एसटी करणार ८ हजार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 15:20 IST

जिल्ह्यातील प्रत्येक आगार आणि बसस्थानक परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे उद्दिष्ट ५ हजार ८०० दिले असले तरी ८ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक आगार आणि बसस्थानक परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. उद्दिष्ट ५ हजार ८०० दिले असले तरी ८ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी आगार प्रमुख वा बसस्थानक व्यवस्थापकांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यभर ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी विविध प्रशासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा आणि विभागनिहाय वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला ६ हजार ८०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. औरंगाबाद  विभागांतर्गत ८ आगार येतात. या आगारांसह प्रमुख बसस्थानक व छोट्या मोठ्या बसस्थानकांवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक आगाराला एक हजार वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे उद्दिष्ट विभागामार्फत देण्यात आले आहे. या आगारांतर्गत येणारे बसस्थानक व छोटे मोठे स्थानक येथे वृक्ष लागवड करण्याचे आदेश आगार प्रमुखांना देण्यात आले आहेत.

यादृष्टीने आगार प्रमुखांना नियोजन करण्यास सांगण्यात आले असून, दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्ष लागवड करण्याची संस्कृती मोडीत काढून या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार केवळ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले नाही. लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन केले जाणार आहे. 

आगारात उद्यानाची संकल्पना आहे

लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धन करण्यासह ज्या आगारात जागा उपलब्ध असेल तेथे उद्यानाची संकल्पना आहे. यातून केवळ जनजागृतीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनही होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात आयएसओ ९००२ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याचे निकष पूर्ण करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. - प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, औरंगाबाद.

टॅग्स :state transportएसटीenvironmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद