शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ८ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; नांदेड,छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक तडाखा

By विकास राऊत | Updated: March 17, 2023 19:05 IST

आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ६ ते ८ व १४ ते १७ मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसाचा ८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. आठ जिल्ह्यांत या काळात ५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; या पावसाने २१ जनावरांचा जीव गेला आहे. हिंगोलीत वीज पडून एकाचा तर परभणीत तिघांचा असे चार जाण दगावले आहेत. २२ नागरिक जखमी झाले आहेत.

८ मार्च रोजीच्या अहवालानुसार जिरायत एक हजार हेक्टर, बागायत दोन हजार ५५ हेक्टर, तर १७ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. हे सगळे नुकसान छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले होते. १४ ते १७ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये १५२ हेक्टर तर नांदेडमध्ये सर्वाधिक ४ हजार ७९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ जनावरे, जालना ९, नांदेड जिल्ह्यात १५, तर हिंगोलीत ३, बीडमध्ये ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना, नांदेड जिल्ह्यांत जास्त पाऊस झाला असून, पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. गहू, कांदा, हरभरा, फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे पीक हातून गेल्याने ते हवालदिल झाले आहेत.

संपाचा पंचनाम्यांवर परिणाममराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर आहेत. विभागातील ४५० मंडळातील तलाठी, मंडळ अधिकारी रजेवर असल्यामुळे प्राथिमक नुकसानीचा अहवाल ई-पाहणीच्या आधारे केला आहे. १४ मार्चपासून महसूल कर्मचारी संपावर आहेत. संपाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही. याचा पडसाद विधानसभेत उमटले. विभागातील सर्व जिल्हाधिकारी तहसिलदार, एसडीएमच्या पथकांसह बांधावर पोहोचले. त्यांनी शेतकर्यांनी चर्चा केला.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेती