शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

८ लाख नागरिकांना मिळणार लस; ३ लाख नागरिकांचे झाले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 14:42 IST

लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देशहर आणि ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या लसींवर आरोग्य यंत्रणेला मोहीम राबवावी लागत आहे.दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आरोग्य यंत्रणेला लढावे लागत आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरा लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ८ लाख तरुणांना लस मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे, तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचे प्राण वाचविणे हेच सर्वात मोठे ध्येय आरोग्य यंत्रणेसमोर आहे. दुसरीकडे शासनाकडून लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी निर्देश देण्यात येत आहेत. केंद्र राज्य शासनाला पाहिजे तसा लसीचा साठा उपलब्ध करून देत नाही. शहर आणि ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या लसींवर आरोग्य यंत्रणेला मोहीम राबवावी लागत आहे. दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आरोग्य यंत्रणेला लढावे लागत आहे.

तुटपुंज्या स्वरूपाचा साठा उपलब्धमहापालिकेकडे मंगळवारी दुपारी लसीचा साठा संपला. ग्रामीण भागात फक्त ६ हजार लसींचा साठा शिल्लक होता. मंगळवारी मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४८ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरासाठी फक्त १५ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरात या लस अडीच दिवस पुरतील. केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिल्या जात नाही.

ज्येष्ठ नागरिकांचा कमी प्रतिसादलसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबतच ज्येष्ठांनाही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात ३ लाख लस देण्यात आल्या. त्यातील फक्त एक लाख लस ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद अद्यापपर्यंत योजनेला मिळालेला नाही.

४५ पेक्षा जास्त वयाचे लसीकरणकेंद्र शासनाने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील २ महिन्यात एक लाख तीन हजार नागरिकांनी लस घेतली. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार प्रयत्न करीत आहे.

दुसऱ्या डोसचे काय?फ्रंटलाइन वर्कर, हेल्थ वर्कर, ज्येष्ठ नागरिक, ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार दुसऱ्या टप्प्यात डोस देण्यात येत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी काही नागरिक कंटाळा करीत आहेत. चार आठवडे उलटल्यानंतरही स्वतःहून डोस घेण्यासाठी येत नाहीत. महापालिका प्रशासन आरोग्य यंत्रणेकडून दुसऱ्या डोसची आठवण देण्यात येते. लसींच्या डोस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

लसीकरण केंद्र वाढवावे लागणारकेंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य यंत्रणेला लसीकरण केंद्र वाढवावे लागणार आहेत. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.

१८,८६,२८४ -मतदार जिल्ह्यातील८,००,००० -१८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या९,९२,८५३ - पुरुष मतदार८,८२,२५८ - महिला मतदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद