शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

औरंगाबाद मनपाला ७५० कोटींचे देणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:26 IST

महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून मागील विकास कामांचा प्रचंड भडिमार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती माहीत असतानाही चक्क दहापट अधिक कामांचा डोंगर रचला. लेखा विभागात आज १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत.

ठळक मुद्देविकासकामांचा भडिमार : १०० कोटींची बिले पडून; ५०० कोटींची कामे अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी मिळून मागील विकास कामांचा प्रचंड भडिमार केला. महापालिकेची आर्थिक स्थिती माहीत असतानाही चक्क दहापट अधिक कामांचा डोंगर रचला. लेखा विभागात आज १०० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ५०० कोटी रुपयांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. आयुक्तांच्या सहीसाठी तब्बल १५० कोटींची कामे थांबली आहेत. महापालिकेची आर्थिक घडी इतिहासात प्रथमच एवढी विस्कटलेली असताना सोमवारी तब्बल १८६४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.मनपाचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात १ कोटींचीच विकास कामे करण्याचा सपाटा लावला होता, त्यामुळे नगरसेवकांना अनावश्यक कामे करता आली नाहीत. त्यांच्या बदलीनंतर नगरसेवक, अधिकाऱ्यांना अक्षरश: रान मोकळे झाले.मागील वर्षी अर्थसंकल्पात समाविष्ट कामांचा धूमधडाकाच लावण्यात आला. कंत्राटदारांना बळजबरी कामे घेण्यास भाग पाडण्यात आले. कंत्राटदारांनीही कोट्यवधी रुपयांची कामे करून टाकली. आता पैसे द्यायचे कोठून, हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. रमजान ईदसाठी कंत्राटदारांना बिले कोठून द्यावीत, हा प्रश्न लेखा विभागाला भेडसावत आहे. सध्या १०० कोटींची बिले लेखा विभागात पडून आहेत.११५ वॉर्डांमध्ये जवळपास ५०० कोटी रुपयांची कामे होत आली आहेत. लवकरच बिले तयार होऊन दायित्व लेखा विभागावर येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून आयुक्तांच्या सह्या न झालेल्या फायलींची संख्या जवळपास ८५० आहे. या फायलींवर सह्या झाल्या तर किमान १५० कोटींची बिले लेखा विभागात येतील. यामध्ये काही वर्क आॅर्डरच्या फायलीही आहेत.मनपाची झोळी रिकामीशासनाकडून जीएसटीपोटी २१ कोटी रुपये येतात. या रकमेत कर्मचाºयांचा पगार होतो. इतर विभागांकडून मिळणाºया वसुलीत अत्यावश्यक खर्च होतो. कंत्राटदारांना देण्यासाठी तिजोरीत पैसेच नसतात. उत्पन्न वाढावे यादृष्टीने प्रशासन, पदाधिकाºयांकडून कधी प्रयत्नच झालेले नाहीत.महापौरांचा सावध पवित्रामनपाच्या तिजोरीत दरवर्षी ७०० कोटी रुपये येतात. त्यातील ५०० कोटी रुपये निव्वळ पगार, अत्यावश्यक कामांवर खर्च होतात. असे असताना १८६४ कोटी रुपयांचे अर्थसंकल्प कशासाठी मंजूर करण्यात आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी नमूद केले की, तिजोरीत पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पैसे उभे करण्यात येतील. हळूहळू कंत्राटदारांची बिलेही दिली जातील. परिस्थितीतून मार्ग तर काढावाच लागेल. आयुक्तांनी सुचवलेली कामेही शहरासाठी आवश्यक आहेत. मालमत्ता कर आणि इतर माध्यमांतून येत्या काही दिवसांत पैसे उभे केले जातील.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प 2023fundsनिधी