शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ७२ हजार विद्यार्थी देणार अभियांत्रिकीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:40 IST

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, बी. टेक., आर्किटेक्चर, व्हेटर्नरीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी (दि.९) राज्यभरात प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ३२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ७२ हजार ९२५ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.

ठळक मुद्देआठ जिल्ह्यांत २३१ केंदे्र; प्रशासनाची जोरदार तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, बी. टेक., आर्किटेक्चर, व्हेटर्नरीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी (दि.९) राज्यभरात प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ३२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ७२ हजार ९२५ विद्यार्थीपरीक्षा देणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-२०१८ ची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. नीट, जेईई या परीक्षेनंतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाची असलेली ही परीक्षा आहे. या सीईटीच्या माध्यमातूनच यावर्षीपासून कृषीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे परीक्षेला अर्ज करणाºया विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी १२ टक्क्यांनी अधिक वाढली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाºयांनी सांगितले. ही परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे. यात विविध अभ्यासक्रमांचा समावेश असल्यामुळे दोन सत्रांऐवजी तीन सत्रांत ही परीक्षा होत आहे. या परीक्षेची तयारी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणात आणि तंत्रशिक्षण सहसचिव कार्यालयाच्या समन्वयातून ही परीक्षा पार पाडण्यात येत आहे.परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीएमएचटी-सीईटी परीक्षा केंद्रावर कोणताही गोंधळ होऊ नये, परीक्षा सुरळीत पार पाडली जावी, यासाठी परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून २०० मीटर अंतराच्या आतील सर्व प्रकारची झेरॉक्स केंद्र, एसटीडी कॉल सेंटर बंद ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :examपरीक्षाMarathwadaमराठवाडाStudentविद्यार्थी