मॅरेथॉनमध्ये धावले ७०० आबालवृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:02 AM2018-03-19T01:02:48+5:302018-03-19T01:02:59+5:30

सिंधी समाजाचे आराध्य दैवत श्री झुलेलाल भगवान यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १८) सिंधी समाज व झुलेलाल सेवा समितीतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३ वर्षांच्या बालकापासून तर ज्येष्ठ अशा सुमारे ७०० महिला-पुरुष, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

700 persons ran in the marathon | मॅरेथॉनमध्ये धावले ७०० आबालवृद्ध

मॅरेथॉनमध्ये धावले ७०० आबालवृद्ध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिंधी समाजाचे आराध्य दैवत श्री झुलेलाल भगवान यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १८) सिंधी समाज व झुलेलाल सेवा समितीतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३ वर्षांच्या बालकापासून तर ज्येष्ठ अशा सुमारे ७०० महिला-पुरुष, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
मॅरेथॉनपूर्वी सिंधी कॉलनीतील सोसायटी मैदानात सकाळी ६.३० वाजता वॉर्मअपचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता मॅरेथॉनचे उद््घाटन झाले.
याप्रसंगी सिंधी समाज अध्यक्ष किशनचंद तनवाणी, कल्याणदास माटरा, मुकुंद भोगले, नितीन घोरपडे, झुलेलाल सेवा समितीचे अध्यक्ष राजू तनवाणी, सचिव भरतलाल निहालानी, उपाध्यक्ष राजू परसवाणी, आनंद दयालानी, शंकरलाल गुनवाणी, विनोद चोटलानी, शंकर बजाज, देशराज (राजा) डेबरा, गिरीश तोलवानी, गौरव केलानी, बबीता परसवाणी, मोना चोटलानी, संजय परसवाणी, राकेश काल्डा आदी उपस्थित होते.
सिंधी कॉलनी परिसरात ३ कि.मी. आणि ५ कि.मी. मॅरेथॉन पार पडली. यामध्ये स्पर्धकांनी ३ कि.मी.चे अंतर १३ मिनिटांत, तर ५ कि.मी.चे अंतर २५ मिनिटांत पूर्ण केले.
दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी धावण्याचे पर्यायाने व्यायामाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे, यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.
श्री झुलेलाल भगवान यांच्या जयंतीनिमित्त १९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता श्री झुलेलाल भगवान यांचा पंचामृत स्नान सोहळा, ६.१५ वाजता प्रभात फेरी, ८.३० वाजता सामूहिक आरती, ११ वाजता कंवर कुटियाँ येथून वाहन रॅली काढण्यात येईल.
सायंकाळी ६ वाजता शहागंज येथील वरुणदेव जलाश्रम ते सिंधी कॉलनी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सिंधी महिला ढोल पथक शोभायात्रेचे मुख्य आकर्षक असणार आहे. कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन झुलेलाल सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: 700 persons ran in the marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.