शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

वर्षभर दडपलेल्या ७० संचिकांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:09 IST

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहात विकास कामांच्या संचिका मागवून जागेवरच मंजुरी देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. मागील एक वर्षापासून अधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारण, चिरीमिरीच्या आमिषापोटी या संचिका दाबून ठेवल्या होत्या. दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नगरसेवकांनी एकच आक्रोश केल्यानंतर सर्वसाधारण सभेत अधिकारी संचिकांवर सह्या करताना दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहात विकास कामांच्या संचिका मागवून जागेवरच मंजुरी देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. मागील एक वर्षापासून अधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारण, चिरीमिरीच्या आमिषापोटी या संचिका दाबून ठेवल्या होत्या. दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नगरसेवकांनी एकच आक्रोश केल्यानंतर सर्वसाधारण सभेत अधिकारी संचिकांवर सह्या करताना दिसून आले.शहरातील ११५ वॉर्डांमध्ये अनेक ठिकाणी दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यापेक्षा अधिकारी व कर्मचा-यांनी अनेक ठिकाणी जलवाहिन्या बदलण्याचे प्रस्ताव तयार केले. हळूहळू या संचिका साचूनसाचून विभागात मोठा ढिगार तयारझाला.  महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व पाणीपुरवठ्याच्या संचिका सर्वसाधारण सभेत मागवून घेतल्या. महापौरांच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये अधिका-यांना बसवून त्या संचिका मंजूर करून घेतल्या.त्या अधिका-यांवर कारवाईची मागणीमनपाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार पाणीपुरवठ्याची कामे करण्यास एकही कंत्राटदार तयार नाहीत. १५ ते २० टक्के अधिक दरानेच कामे करण्यास कंत्राटदार तयार आहेत. यापूर्वी मनपाने ३९ टक्के अधिक दराने पाणीपुरवठ्याची कामे करून घेतली आहेत. मागील एक वर्षापासून नगरसेवकांच्या विविध फायली पडून होत्या. दूषित पाण्यामुळे लाखो नागरिक आजही त्रस्त आहेत. नागरिकांना वेठीस धरणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणीही सभेत करण्यात आली.कामे पोहोचली. तत्कालीन कार्यकारी अभियंता सरताजसिंह चहल यांनी काही खाजगी एजन्सीधारकांकडून पाईपचे दरपत्रक घेतले. हे दर कमी होते. विद्यमान कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कंपन्यांकडून पाईपचे दर घेतले. कंपन्यांनी दर जास्तीचे दिले.चहल यांनी दरपत्रक आयुक्तांसमोर ठेवून मी महापालिकेचे आर्थिक हित जपत असल्याचे निदर्शनास आणून दिले. वास्तविक पाहता एजन्सीचे दर कंपन्यांपेक्षा जास्त असायला हवे होते.कोल्हे यांना अडचणीत आणण्यासाठी हा सर्व डाव होता, असेही नगरसेवक राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ यांनी सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMayorमहापौर