शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाला लागणार ७ हजार ४३० ईव्हीएम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:23 IST

उमेदवारांच्या नावासह मतपत्रिका लावण्याची प्रक्रिया पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी ६ हजार १९९ बीयू (बॅलेट युनिट ) लागणार आहेत. २० टक्के आरक्षित यंत्रासह ७ हजार ४३० यंत्र प्रशासनाला तयार ठेवावी लागतील. ४ हजार २३९ व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेसाठी तयार असतील. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अंतिम केल्या असून, जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ३२ लाख २ हजार ६७ इतकी झाली आहे.

प्रशासनाने नऊ मतदारसंघांत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सज्ज केल्या आहेत. त्यावर उमेदवारांचा क्रम, बॅलेट पेपर लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या १८ अभियंत्यांनी हे काम पूर्ण केल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपणार आहे. मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष यांना आतापर्यंत दोनवेळा प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यात पुरेशा ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन याआधीच पुरविल्या आहेत. तिथे त्यांच्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली. त्या-त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव, त्यांचे चिन्ह, त्यांचा क्रम यानुसार ईव्हीएम मशीनच्या बॅलेट युनीट आणि कंट्रोल युनिटमध्ये सेटिंग करण्याचे आणि त्यावर बॅलेट पेपर चिकटविण्याचे काम झाले आहे.

आठ मतदारसंघात दोन बॅलेट युनिटजिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एका बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे बसतात. मात्र, वैजापूरचा अपवाद वगळता उर्वरित आठ ठिकाणी उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आठ मतदारसंघात मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर दोन-दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. कंट्रोल युनिट मात्र एकच लागेल. कन्नड मतदारसंघात १६ उमेदवार आहेत. त्यांची नावे एकाच मशीनवर बसतात. परंतु, निवडणुकीत नोटाचा पर्यायही असल्याने या मतदारसंघात केवळ नोटासाठी म्हणून दुसरे बॅलेट युनिट वापरावे लागणार आहे.

मतदारसंघनिहाय किती ईव्हीएम लागणार

सिल्लोड : ९७४कन्नड : ८८३

फुलंब्री : ८९३औरंगाबाद मध्य : ७६८

औरंगाबाद पश्चिम : ९६२औरंगाबाद पूर्व : ७९२

पैठण : ८४२गंगापूर : ८९३

वैजापूर : ४२३एकूण : ७४३०

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर