शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदींविरोधी ६९ टक्के जनतेने एक होऊन देश आणि संविधान वाचवावे’ : कन्हैयाकुमार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:16 IST

‘मोदींविरोधी ६९ टक्के जनतेने एक होऊन देश आणि संविधान वाचवावे’ : कन्हैयाकुमार 

ठळक मुद्दे कॉर्पोरेट लूट आणि जातीयवाद थांबवण्याचे आवाहन

औरंगाबाद : फक्त ३१ टक्के मतदारांनी निवडून दिलेले हे मोदी सरकार आहे. ३१ आकडा मोठा आहे की उर्वरित ६९? मग आता ६९ टक्के मतदारांनी एक होऊन देश आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. देशातील तमाम संविधानवादी व धर्मनिरपेक्षवादी संस्था-संघटना व पक्षांनी एक व्हावे व देश तोडणारी भाजपा, आरएसएस यांचा दारुण पराभव करावा, असे कळकळीचे आवाहन रविवारी येथे देशाचे युवा नेते कॉ. कन्हैयाकुमार यांनी केले. आपल्या खास बिहारी शैलीत तब्बल पाऊणतास मोदींच्या मर्मावर बोट ठेवणारे भाषण करीत कन्हैयाकुमार यांनी ही सभा जिंकली.

सध्या देशात सुरू असलेला जातीयवाद आणि कॉर्पोरेट लूट थांबलीच पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. आमखास मैदानावर ‘देश बचाव... संविधान बचाव’ अभियानांतर्गत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि विविध धर्मनिरपेक्ष व संविधानवादी संस्था-संघटनांनी ही जाहीर सभा आयोजित केली होती. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या सभेला मिळाला. पाच हजार खुर्च्या भरून लोकांनी कन्हैयाकुमार यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘तुमचं आमचं नातं काय... जय शिवराय, जय भीमराय’ ही घोषणा त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेत व डफावर ‘आझादी’चे  क्रांतिगीत म्हणत या सभेचा समारोप कन्हैयाकुमार यांनी केला. सभेचे संयोजक आ. सतीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. आमदार बाबाजानी दुर्राणी, कॉ. तुकाराम भस्मे, प्रा. सुनील मगरे, प्रा. उमाकांत राठोड, अमोल दांडगे, शेख जहूर, इलियास किरमाणी आदींची भाषणे झाली. यावेळी एमआयएमवर किरमाणी यांनी सडकून टीका केली. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. संविधानाची प्रत देऊन चव्हाण यांनी कन्हैयाकुमार यांचे स्वागत केले. कॉ. राम बाहेती, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. अश्फाक सलामी आदींसह मंचावर इतर नेते उपस्थित होते.आता सत्तेसाठी रामाचा वापर...आता मोदींच्या नावाने सत्ता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर रामनामाचा जप सुरू आहे. यांना मंदिर बांधायला रोखले कुणी? यांना मंदिर बनवायचेच नाही. त्या मुद्यावर हे दोनदा सत्तेत आले. आता पुन्हा राम मंदिराच्या मुद्यावरच सत्ता हस्तगत करायची आहे. १९९२ साली बाबरी पाडली. आता २०१८ चालू आहे. हा आस्थेचा प्रश्न जरूर आहे; पण मशीद पाडण्यापूर्वीही आस्था होतीच. या सरकारची विचारधाराच मनुस्मृतीवर आधारित असल्यामुळे आज कोणीही समाधानी नाही, असे कन्हैयाकुमार यांनी यावेळी नमूद केले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबाद