शहरं
Join us  
Trending Stories
1
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
2
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
3
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
4
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
5
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
6
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
7
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
8
‘पीओके’ हा पाकिस्तानचा भाग नाही, इस्लामाबाद हायकोर्टात पाकची कबुली
9
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
10
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार
11
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
12
सुनीता विल्यम्स यांच्या अवकाश मोहिमेला ब्रेक
13
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
14
मनोज जरांगे-पाटील यांचे ४ जूनपासून पुन्हा उपोषण
15
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
16
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
17
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
18
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
19
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
20
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...

नाताळ-नववर्षानिमित्त ६० हजार छत्रपती संभाजीनगरवासीय पर्यटनाला; 'या' ठिकाणांना पसंती

By संतोष हिरेमठ | Published: December 22, 2023 1:52 PM

पर्यटनाच्या प्लॅनिंगने विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग होतेय फुल

 

छत्रपती संभाजीनगर : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी शहरवासीयांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळणार आहेत. त्यासाठी विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग करण्यावर भर दिला जात आहे. आगामी १० दिवसांत किमान ६० हजार शहरवासीय विविध ठिकाणी पर्यटनाला जातील, असे टूर्स व्यावसायिकांनी सांगितले.

नाताळ सण, वीकेण्ड आणि त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप असा तिहेरी योग जुळून आल्याने सुट्यांचा आनंद पर्यटनाच्या ठिकाणी घेण्याकडे शहरवासीयांचा ओढा दिसून येत आहे. अनेकांनी काही महिन्यांआधीच पर्यटनाचे नियोजन केलेले असल्याने त्यांना अगदी कमी दरात सहलीचा आनंद घेता येणार आहे; परंतु ऐनवेळी नियोजन करणाऱ्यांना अधिक रक्कम मोजावी लागत आहे. पर्यटनाच्या प्लॅनिंगने विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग होत असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्या ठिकाणांना पसंती?गोवा, कोकण, काश्मीर, राजस्थान, बंगळुरू, हम्पी, बदामी, स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्थळांकडे पर्यटकांचा ओढा आहे. त्याबरोबर तिरुपती बालाजी, अयोध्या या ठिकाणाकडेही ओढा आहे. कोरोनामुळे केरळ चर्चेत असले असले तरी पर्यटकांचा ओढा केरळकडे कायम असल्याचेही सांगण्यात आले.

गोव्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्षचनाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गाेव्याला जाण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, गोव्यासाठी विशेष रेल्वेच्या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनाने अथवा अन्य शहर गाठून रेल्वेने प्रवास करावा लागत आहे.

४ ते ५ दिवसांच्या पर्यटनाला पसंतीनाताळच्या वेळी सलग सुट्या आल्या आहेत. त्यामुळे ४ ते ५ दिवसांत होणाऱ्या पर्यटनाला पसंती दिली जात आहे. नववर्षापर्यंत किमान शहरातून जवळपास ६० हजार नागरिक विविध ठिकाणी पर्यटनाला जातील. अयोध्याला जाण्याकडेही कल वाढला आहे.- मंगेश कपोते, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनChristmasनाताळ