छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काम म्हणजे वारातीमागून घोडे, अशी अवस्था झाली आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधी रुपये खर्च करून सहा मोठे जलकुंभ बांधून तयार आहेत. सर्व जलकुंभांची टेस्टिंग, कलरसुद्धा करून ठेवण्यात आले. मात्र, यांचा वापर सुरू केला नाही. ‘लोकमत’ने याचा आढावा घेतला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
एका जलकुंभाजवळ जुनी जलवाहिनी नाही. जलकुंभापासून जुन्या जलवाहिन्यांपर्यंत लागणारे पाइपच टाकण्यात आलेले नाहीत. हे अंतर थोडेथिडके नसून, दोन ते चार किमी इतके आहे. न्यायालयात, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत प्रत्येकवेळी जलकुंभ लवकर बांधून हस्तांतरित करा, अशी ओरड होते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती कोणीही सांगायला तयार नाही.
१) दिल्ली गेट- ३०.७० लाख लिटर क्षमता. २० मीटर उंची. ४० ते ४५ हजार नागरिकांना प्रेशरने पाणी मिळेल.......................................................................................................... २) शाक्यनगर- २६.५० लाख लिटर क्षमता. १० मीटर उंची. ३० ते ३५ हजार लोकसंख्येला विनामोटार पाणी मिळेल............................................................................................................... ३) मिसारवाडी- १९.३० लाख लिटर क्षमता. २० मीटर उंची. १८ हजारांहून अधिक नागरिकांना पाणी मिळेल. नो नेटवर्क एरिया असल्याने तूर्त पाणी देणे अशक्य.................................................................................................................. ४) प्रतापनगर - ९.९० लाख लिटर क्षमता. २२ मीटर उंची. १२ हजारांहून अधिक नागरिकांचा जलकुंभाचा लाभ मिळेल....................................................................................................................५) केटली गार्डन- २४.१५ लाख लिटर क्षमता. १८ मीटर उंची. २५ ते ३० हजार नागरिकांना प्रेशरने पाणी मिळू शकते............................................................................................६) एसएफएस- ७.५ लाख लिटर क्षमता. बैठक संप. १० हजारांहून अधिक लोकसंख्येला लाभ हाेऊ शकतो.