शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

जायकवाडी धरणाचे ६ दरवाजे उघडून विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:06 IST

यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.

- दादासाहेब गलांडेपैठण : येथील जायकवाडी धरणातीलपाणीसाठा रविवारी सायंकाळी ६ वाजता ९६.३७ टक्के झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ६ वाजता जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहचला. धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली होती. त्यानुसार आज दुपारी १२ ते  १ वाजेच्या दरम्यान धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.

जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रासह नाशिक परिसरातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. असे असले तरी धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी ६ वाजता १५२१.३९ फूट (९६.३७ टक्के) झाला. धरणाची क्षमता १५२२ फूट आहे. धरणात रविवारी २०९२.१२४ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा होता. धरणात पाण्याची १८ हजार ७२ क्युसेकने आवक होत असून उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळी ६ वाजता  जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर पाणीसाठा ९८ टक्के झाल्यानंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान नाथसागर धरणाचे गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ आणि २१ असे एकूण सहा दरवाजे ०. ५ फुट उंचीने उघडून ३ हजार १४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांतील गोदावरी नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी