शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

पडेगाव-मिटमिट्यात ५८५ टोलेजंग अतिक्रमणांवर हातोडा; मनपा, पोलिस रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:15 IST

आक्रोश, विराेध, आरोप, अस्वस्थता आणि इमारतींचा धुराळा, मलबा असे चित्र पाडापाडी कारवाईप्रसंगी ७.५ कि.मी. अंतरात होते.

छत्रपती संभाजीनगर : शहरातून नगरनाका, छावणी मार्गे पडेगाव व मिटमिटा या भागातून जाणाऱ्या मुंबई हायवेवरील टोलेजंग अतिक्रमित इमारतींवर महापालिकेने गुरूवारी सकाळपासून कारवाईचा हातोडा चालविला. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त होता. कारवाईच्या पहिल्या दिवशी मिटमिटा शाळेपर्यंतची ५८५ अतिक्रमणे पाडण्यात आली. यात टोलेजंग इमारती, पक्की आणि कच्ची बांधकामे, हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड, कम्पाउंड, ओटे, गॅरेज, वॅाशिंग सेंटर, कमान, जाहिरात फलकांचा समावेश आहे.

आक्रोश, विराेध, आरोप, अस्वस्थता आणि इमारतींचा धुराळा, मलबा असे चित्र पाडापाडी कारवाईप्रसंगी ७.५ कि.मी. अंतरात होते. या मोहिमेमुळे दररोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांनी तसेच, त्या भागात राहणाऱ्या सुमारे २० वसाहतींतील सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रस्ता रुंदीकरण आणि मोजणीचे अंतर यातून अतिक्रमित मालमत्ताधारकांचे आणि पालिकेच्या पथकाचे खटके उडाले. तसेच काही मालमत्ताधारकांना स्वत:हून अतिक्रमण पाडण्यास मुभा दिली. काही ठिकाणी विनंती करूनही मनपाच्या पथकाने वेळ न दिल्याचा आरोप झाला. यातून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले हाेते. नगरनाका ते शरणापूर फाट्यापर्यंत सर्वत्र अतिक्रमण हटाव कारवाईचे चित्र होते. रस्त्याची पूर्ण पाहणी करून आढावा घेतला असता अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याच दिसले. आज पहिल्या दिवशीच्या कारवाईनंतर, शुक्रवारी पुन्हा त्याच भागात पालिकेचे पथक कारवाईसाठी धडकणार आहे. दरम्यान, कारवाईमुळे अनेक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होेते. कारवाई करू नका, अशी आर्जव ते पालिकेकडे करताना दिसले.

प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशाने केलेल्या कारवाईत अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, नगररचना विभागाचे उपसंचालक गर्जे, अभियंता अमोल कुलकर्णी, सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, मनपा उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, समीउल्लाह, भारत बिरारे, राहुल जाधव, नईम अन्सारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सौरभ साळवे, सूरज संवडकर, शिवाजी लोखंडे, प्रमोद जाधव सहभागी होते.

मार्किंगवरून नाराजीछावणी हद्दीत पूर्ण रस्ता १० मीटर म्हणजेच ३० फुट रुंदीचा असेल, तर उर्वरित ७.५ कि.मी. रस्ता हा दुभाजकासह ६० फुटांचा असेल. दोन्ही बाजूंनी ५ मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती केंद्रबिंदू ठरवून मनपाच्या पथकाने दुतर्फा मार्किंग केल्यावर पाडापाडीसाठी बुलडोझर सरसावले. गुगल मॅपिंगवरील मोजणी वेगळी, विकास आराखड्यातील रेखांकनाची मोजणी वेगळी, तर ऑन दी स्पॉट केलेली मोजणी वेगळी असल्याचे अनेक ठिकाणी समोर आल्याने नागरिकांनी मनपा पथकासोबत हुज्जत घातली. यातून सायंकाळी मिटमिटा येथे वाद होऊन प्रकरण पाेलिसांत गेले.

अनेकांना वेळ दिल्याने आरोपत्या रस्त्यावर सर्वाधिक हॉटेल्स आहेत. नियमांत बांधकाम केलेल्या मोजक्याच इमारती आढळून आल्या. काही अतिक्रमणधारकांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. तर काही नागरिकांनी स्वत:अतिक्रमण काढण्याची विनंती केली तरी त्यांना मनपाने दाद दिली नाही. यातून नागरिक, पोलिस, मनपा पथकात अनेक ठिकाणी हुज्जत घालणारे चित्र होते. अतिक्रमण मोहिमेचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले की, कुणालाही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा प्रश्न येत नाही. शुक्रवारी सकाळी त्या भागात कारवाई पुन्हा सुरू होईल.

पहिल्या दिवशी किती अतिक्रमणे पाडले?५८५ पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड, कम्पाउड, ओटे, गॅरेज, वॅाशिंग सेंटर, कमान, जाहिरात फलक पाडण्यात आले.

मनपाची टीम किती?३५० अधिकारी, कर्मचारीपोलिस कुमक किती?२५० अधिकारी व कर्मचारी

यांत्रिकी ताफा किती?३० जेसीबी, ८ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब ,५ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका