‘अमृत’ची ५७ कोटींची निविदा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:38 AM2017-08-29T00:38:17+5:302017-08-29T00:38:17+5:30

येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या ५७ कोटी ४२ लाख ५ हजार ९३२ रुपयांच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लागतील, असा सत्ताधाºयांना विश्वास वाटत आहे.

 57 crore tender for 'Amrut' | ‘अमृत’ची ५७ कोटींची निविदा मंजूर

‘अमृत’ची ५७ कोटींची निविदा मंजूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या ५७ कोटी ४२ लाख ५ हजार ९३२ रुपयांच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या योजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठ्याची कामे मार्गी लागतील, असा सत्ताधाºयांना विश्वास वाटत आहे.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पालिकेच्या बी.रघुनाथ सभागृहात समितीची बैठक झाली. यावेळी मनपा आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव मुकूंद कुलकर्णी यांच्यासह समितीचे सदस्य व अधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी अमृत अभियानांतर्गत परभणी शहरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेविषयी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये या योजनेअंतर्गत ३७ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, शुद्ध पाणी व धरण नलिका पाईपलाईन पुरवठ्यासह अंथरुन चाचणी देणे, २० लक्ष लिटर क्षमतेचे संतुलन जलकुंभ बांधणे, शुद्ध जलयुक्त वाहिनी उभारणे, शहरात ६ जलकुंभ बांधणे आदी कामे करण्यात येणाºया ५७ कोटी ४२ लाख ५ हजार ९३२ रुपयांच्या कामांच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. हे काम औरंगाबाद येथील विजय कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला देण्यात आले. या विषयावरील झालेल्या चर्चेत सुनील देशमुख, महमद जानू, सचिन अंबिलवादे, इम्रान लाला, मोकिंद खिल्लारे, नंदू दरक, अनिता सोनकांबळे यांनी सहभाग घेतला. यावेळी २०१५-१६ च्या दलित्तोतर विकास योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ४० लाख रुपयांच्या निविदेलाही मंजुरी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका योजनेअंतर्गत प्राप्त होणाºया निधी अंतर्गत गंगाखेड रोडवरील साखला प्लॉट भागात जवळपास १ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाºया रात्र निवारा इमारत बांधकामासही मंजुरी देण्यात आली.
याबाबतचा प्रश्न सुनील देशमुख यांनी उपस्थित केला होता. तसेच प्रभाग क्रमांक ३० मधील वर्मानगर भागात दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २० लाख रुपये निधीतून करण्यात येणाºया कामासही मंजुरी देण्यात आली.

Web Title:  57 crore tender for 'Amrut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.