शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतून ५०० टन कचरा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:39 IST

कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला.

ठळक मुद्देचार दिवस शिल्लक : झाल्टा येथे विरोध; पोलीस कुमक मागविली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर टक्के कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा महापौरांकडून करण्यात आला. शहरातील कचरा झाल्टा येथे टाकण्यात येत असताना परिसरातील नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविला. महापालिकेने अतिरिक्त पोलीस कुमक मागविल्याने विरोध मावळला.शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत एकूण ५ हजार टन कचरा पडून आहे. उचलण्यात आलेला कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न सर्व वॉर्ड अधिकाºयांना पडला आहे. ज्या वॉर्डात ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो तेथेच सुजलाम् सुफलाम् आहे. जिथे ओला व सुका मिक्स करून कचरा जमा करण्यात येतो तेथे प्रश्न गंभीर आहे. प्रभाग १, २, ३ आणि ९ मध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपासून व्यापक मोहीम राबविण्यात आली. जिथे मोठमोठे कचºयाचे डोंगर साचले आहेत तो कचरा उचलण्यास सुरुवात केली. किलेअर्क, समर्थनगर, पैठणगेट, जकात नाका, औरंगपुरा येथील कचरा उचलण्यात आला. हा सर्व प्रक्रिया केलेला कचरा आहे. या कचºयाचे स्क्रिनिंग झाल्टा येथे करण्याचे निश्चित झाले. दुपारी महापालिकेच्या आणि खाजगी कचºयाच्या गाड्या झाल्टा येथे पोहोचताच नागरिकांकडून प्रखर विरोध सुरू झाला.येथे कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, एम.बी. काझी, एस.एस. कुलकर्णी यांनी नागरिकांना सांगितले. नागरिक अजिबात ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रशासनाने त्वरित महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथकही मागवून घेतले. त्यानंतरही नागरिकांचा विरोध सुरूच होता. मनपाने अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली. त्यानंतर नागरिकांचा विरोध मावळला. दिवसभरात २५ पेक्षा अधिक ट्रक कचरा या ठिकाणी टाकण्यात आला. रात्रीही कचरा टाकण्यात येणार आहे. नाशिकच्या कंपनीमार्फत कचºयाचे स्क्रिनिंग करण्यात येईल.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका