शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

नागझरीतले ५०० एमएलडी पाणी घटले

By admin | Updated: August 19, 2016 01:01 IST

लातूर : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लातूर शहरासह जिल्ह्यात फक्त एक मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा नदीवरील नागझरी व साई बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले़

लातूर : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लातूर शहरासह जिल्ह्यात फक्त एक मोठा पाऊस झाल्यामुळे मांजरा नदीवरील नागझरी व साई बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले़ त्यामुळे शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे़ मात्र या दोन्हीही बॅरेजेसमधील पाणी झपाट्याने उतरत आहे़ नागझरी बॅरेजेसमधील ५०० एमएलडी पाणी घटले आहे़ शहरासाठी गेल्या १८ दिवसात २२० एमएलडी पाणी उचलले असले तरी बॅरेजेसमधील पाणी त्या तुलनेत झपाट्याने उतरले आहे़ यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्या संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे़जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या एका पावसात नागझरी बॅरेजेसमध्ये ३़३० एम़एमक़्युब पाणीसाठी झाला होता़ तर साई बॅरेजेसमध्ये ०़२२ एमएमक्युब पाणी संकलित झाले़ लातूरकरांना मोठा आनंद झाला़ महानगर प्रशासनानेही तत्काळ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला़ मात्र त्यानंतर लातूर शहर व परिसरात पाऊस झाला नाही़ तब्बल अठरा दिवस झाले, या अठरा दिवसात मोठा एकही पाऊस झाला नसल्यामुळे बॅरेजेसमध्ये पाणीसाठा झाला नाही़ उलट संकलित झालेले पाणी झपाट्याने उतरत आहे़ ३़३० एमएमक्युब नागझरी बॅरेजेसमध्ये पाणी होते़ मात्र आता या बॅरेजेसमध्ये २़८ एमएमक्युब पाणी आहे़ पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी कालच या प्रकल्पातील उपलब्ध पाण्याची चाचपणी घेतली असता ०़५० एमएमक्युबने पाणी उतरले असल्याचे निदर्शनास आले आहे़ लातूर शहरासाठी दररोज नागझरी येथून १२ एमएलडी पाणी उचलण्यात आले आहे़ गेल्या १८ दिवसात ०़२२ एमएमक्युब पाणी उचलण्यात आले आहे़ मात्र त्या तुलनेत अधिक पाणी घटले आहे़ ०़२८ एमएमक्युब पाणी वापर न होता घटले आहे़ तसेच साई बंधाऱ्यात ०़२२ एमएमक्युब पाणीसाठा झाला होता़ यातीलही १़५० एमएलडी पाणी घटले आहे़ बाष्पीभवन होऊन तसेच चर खोदल्यामुळे पाणी आतल्या आत मुरत आहे़ त्यामुळेच ०़२८ एमएमक्युब पाणी वापर न होता घटले असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी निष्कर्ष काढला आहे़ पाणी मोठ्या प्रमाणात घटत असल्यामुळे महानगर पालिका प्रशासनाला भविष्यातील पाण्याची चिंता वाटत आहे़ योग्य नियोजनाची गरज आहे़ (प्रतिनिधी)लातूर शहरात १ आॅगस्टपासून नळाने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ नागझरी व साई प्रकल्पातून दररोज १२ ते १५ एमएलडी पाणी उचलण्यात आले असून, आतापर्यंत २२० एमएलडी पाणी मनपाने या दोन्हीही प्रकल्पातून उचलले आहे़ दरम्यान, १ ते १७ आॅगस्ट दरम्यान शहरात नळाद्वारे पाणीपुरवठ्याची पहिली फेरी पूर्ण झाली आहे़ मात्र बॅरेजेसमधील पाणी झपाट्याने उतरत आहे़ शिवाय, पावसानेही ओढ दिली आहे़ त्यामुळे पाण्याची चिंता मनपा प्रशासनाला परत भेडसावत आहे़