शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

औरंगाबाद जिल्ह्याची ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:39 IST

जिल्ह्यातील १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरचे पाणी

ठळक मुद्देसरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने पाणीपुरवठा  

औरंगाबाद : जिल्ह्यातील हजार दोन हजार नव्हे, तर तब्बल १८ लाख ७९ हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या सरत्या दशकात पहिल्यांदाच ११५० टँकरने जिल्ह्यातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५० टक्के लोकसंख्या पाण्यासाठी व्याकूळ असून, आता दमदार पावसाळ्याची प्रतीक्षा आहे. 

३७ लाखांच्या आसपास जिल्ह्याची लोकसंख्या आहे. यातील ५० टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मध्यम, लघु प्रकल्प आटले असून, टँकरशिवाय ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कुठलाही पर्याय नाही. ७३८ गावे आणि २६९  वाड्यांवर पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागते आहे. ५३६ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे. औरंगाबाद तालुक्यातील १३७ गावांतील ४ लाख ६ हजार ३७२ नागरिकांना १९४ टँकर, फुलंब्री तालुक्यातील ६८ गावांतील १ लाख ८५ हजार ९१६ नागरिकांना ११४ टँकर, पैठण तालुक्यातील ९८ गावांतील २ लाख ५१ हजार ६७१ नागरिकांना १३६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

गंगापूर तालुक्यातील १४५ गावांतील २ लाख ६४ हजार ५७२ नागरिकांना १७७ टँकर, वैजापूर तालुक्यातील १२५ गावांतील २ लाख १४ हजार ८१२ नागरिकांना १८५ टँकर, खुलताबाद तालुक्यातील ३३ गावांतील ९० हजार ५४४ नागरिकांना ५० टँकर, कन्नड तालुक्यातील ५९ गावांतील १ लाख २९ हजार ४५५ नागरिकांना ८३ टँकर, सिल्लोड तालुक्यातील ९६ गावांतील ३ लाख २० हजार ५८० नागरिकांना १९४ टँकरने, तर सोयगाव तालुक्यातील ७ गावांतील १५ हजार ८२ नागरिकांना १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

तालुकानिहाय टँकरतालुका    टँकरऔरंगाबाद    १९४फुलंब्री    ११४पैठण    ९८गंगापूर    १७७वैजापूर    १८५खुलताबाद    ५०कन्नड    ८३सिल्लोड    १९४सोयगाव    १३एकूण    ११४६

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद