शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा विकास मंडळाला ५० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 14:13 IST

शेतकरी, बचत गटाला प्राधान्य द्यावे

ठळक मुद्देपारंपरिक पद्धतीनुसार खर्च करता येणार नाही

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाला ४ ऑगस्ट २०१४ नंतर २३ जुलै २०१९ रोजी ५० कोटींचा निधी शासनाने देऊ केला आहे. मंडळाला या निधीतून समाजमंदिरे, व्यायामशाळा बांधता येणार नाहीत. शेतकरी उत्पादक, महिला बचत गटांसाठी विशेष कामे करावीत, असा स्पष्ट उल्लेख शासनाने मंगळवारी काढलेल्या आदेशात केला आहे.

राज्यातील तिन्ही विकास मंडळांना ६ वर्षांनंतर प्रत्येकी ५० कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वी २०१३-१४ या आर्थिक वर्षात मराठवाडा विकास कामांसाठी मंडळाला १३ कोटींचा निधी मिळाला होता. त्यानंतर मंडळाच्या प्रशासकीय खर्चासाठी १ कोटी मिळत गेले. मानव विकास कार्यक्रमांतर्गत १२५ तालुके व ४५ क वर्ग नगरपालिका क्षेत्रात ५० टक्के निधी खर्च करता येऊ शकतो. मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी मदत होऊ शकते. दुष्काळग्रस्त भागांसाठी पाणीपुरवठा,  महिला कल्याण योजना, कृषी योजनांसाठी निधी देणे, अपंगांसाठी विशेष साधने, प्रशिक्षण देणे. आयटीआय संस्थांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याबाबत मंडळ माध्यम होते, परंतु निधी न मिळाल्यामुळे आजवर मंडळ फक्त पोसले गेले. 

२०१३-१४ मध्ये अध्यादेश काढून प्रत्येक मंडळाला १०० कोटींचा निधी जाहीर केला. त्या निधीतही वित्त विभागाने दांडी मारली. एका मंडळासाठी जाहीर केलेला हा निधी तीन मंडळांसाठी असल्याचे तोंडी आदेश त्यावेळी काढले. १०० कोटींचा निधी मिळणार त्या अनुषंगाने मंडळाने खर्चाचे नियोजन केल्यानंतर १३ कोटींचा निधी देऊन शासनाने हात वर केले होते. आता ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड हे निधी मिळण्यासाठी प्रयत्न करीत होते. १ हजार कोटींच्या अनुदानासाठी त्यांनी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. आता शासनाने निधी देण्यास सुरुवात केली असून, नजीकच्या काळात आणखी निधी मिळवू, असा दावा डॉ. कराड यांनी केला.

अडीच कोटींची मर्यादा प्रत्येक तालुका, नगरपालिका, नगरपंचायत, शहरासाठी जास्तीत जास्त अडीच कोटींचा निधी कुठल्याही एका कामासाठी खर्च करण्याची मर्यादा शासनाने घातली आहे. मंडळाला मिळालेल्या निधीतून अडीच कोटींच्या आतीलच कामे करावी लागणार आहेत. शिवाय एकाच पॅटर्नची कामेदेखील यातून करण्यात येणार नाहीत.

टॅग्स :fundsनिधीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार