सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर धूळखात - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:02 AM2021-04-11T04:02:02+5:302021-04-11T04:02:02+5:30

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटर असलेल्या दुर्गा माता मंगल कार्यालयात भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, ...

5 Ventilator Dust in Sillod Sub-District Hospital - A | सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर धूळखात - A

सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर धूळखात - A

googlenewsNext

सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटर असलेल्या दुर्गा माता मंगल कार्यालयात भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, भाजप कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, सुनील मिरकर, भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय वानखेडे, मधुकर राऊत, वैभव राजपूत आदींनी भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना जाब विचारला.

सिल्लोड शहरात व तालुक्यात प्रशासनाला रुग्णाना सेवा पुरवण्यात दिरंगाई होत आहे. ६ एप्रिल रोजी ८९ जणांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. यापैकी काही लोकांना कोरोना असल्यास त्यांच्यापासून किती जण पॉझिटिव्ह होतील, याबाबत वैद्यकीय अधीक्षक अमित सरदेसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश राठोड यांना जाब विचारला. वैद्यकीय अधीक्षक व आरोग्य कर्मचारी निष्काळजीपणा करत आहेत. कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत. व्हेंटिलेटर असून ते धूळखात पडून आहेत. रिपोर्ट चार- चार दिवस मिळत नाही. यामध्ये तात्काळ सुधारणा न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी इद्रिस मुलतानी यांनी दिला.

फोटो कॅप्शन- सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात राडा करताना भाजप प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, भाजप कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, सुनील मिरकर, भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया आदी.

Web Title: 5 Ventilator Dust in Sillod Sub-District Hospital - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.