शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ५ एमएलडी सांडपाणी रोज होते शुद्ध; पण सोडावे लागते खामनदीत

By साहेबराव हिवराळे | Updated: January 11, 2024 19:14 IST

मानसिकता बदलण्याची आवश्यकता; बांधकाम व्यावसायिक तसेच उद्यान व झाडासाठी पाणी वापरण्यास योग्य

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात आता सकारात्मक खूप कामे होत आहेत त्याचा एक भाग म्हणून आता औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत असून तब्बल पाच एमएलडी पाणी रोज शुद्ध करण्यात येत आहे. हे शुद्ध केलेले पाणी उद्यान, दुभाजकावरील झाडे किंवा औद्योगिक क्षेत्रातील वनीकरणासाठी योग्य असूनही खामनदीत हे पाणी सोडून द्यावे लागत आहे. सीईटीपी प्लांट उभारून व त्याचा योग्य वापर करूनही केवळ इच्छाशक्ती नसल्याने हे पाणी न वापरता नदीत सोडून द्यावे लागत आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती, कडक उन्हाळ्याचा काळ यावेळी औद्योगिक क्षेत्रातील बागबगिचा हिरवागार ठेवण्यासाठी हे पाणी अमृतच ठरणार आहे; परंतु, त्याविषयी कुणीही विचार करीत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील सांडपाणी वाहून गेल्याने परिसरातील जमिनीची पोत खराब झालेली असून, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासावरून लक्षात आले होते. त्यामुळे एमआयडीसीने वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारला. पूर्ण एमआयडीसीतील कारखान्याचे टाकाऊ पाणी यामुळे शुद्ध होऊ लागले आहे. याची उभारणी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी झाली होती हे विशेष. असे असले तरीही आज जमिनीचा पोत सुधारलेला नाही. पूर्वी जे सांडपाणी मोकळ्या प्लॉटवर किंवा नाल्यात, नदीत सोडण्याचे प्रकार होत होते. यामुळे परिसरातील शेतकरी, मेंढपाळ तसेच गोपालकांना या सांडपाण्याचा मोठा फटका बसलेला होता. अनेक शेतकरी तसेच गोपालकांनी सांडपाण्याची ओरड केली होती त्याची दखल घेत सीईटीपी प्लांट उभारण्यात आला.

सांडपाणी वाहून आणले प्लांटमध्ये...रसायनयुक्त पाणी, ऑइल, इतर वापराचे पाणी या प्लांटमध्ये भूमिगत वाहिनी टाकून वाहून आणले आहे. दररोज पाच एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नाइलाजास्तव नदीत सोडले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी विकणे किंवा नदीत टाकण्यापेक्षा ते बांधकाम व्यावसायिक तसेच एमआयडीसीने लावलेल्या झाडांना टाकल्यास परिसरात हिरवळ कायम राहू शकेल, असाही निसर्गमित्रांचा आग्रह आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करावी...जमिनीतील पाणी दूषित झाले असून, ते योग्य नाही असे म्हटले तरी चालेल; परंतु, आपण जमिनीत रेन वाॅटर हार्वेस्टिंगनेही पावसाचे पाणी जमिनीत जिरवू शकतो. जमिनीची पोत सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळही यावर काम करीत आहे. उद्योजकांनी मार्ग अवलंबला पाहिजे.- अनिल पाटील, पाणी चळवळ

बांधकाम व्यवसाय व बागांसाठी पाणी नेता येईल..औद्योगिक क्षेत्रातील घाण पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते वापरायोग्य होते, झाड तसेच बांधकामासाठी नेता येईल; परंतु, तसेच कुणाची मागणी आलेली नाही.- गीतेश साबणे, प्लांट प्रमुख

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीWaluj MIDCवाळूज एमआयडीसी