शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबईतील कंपनीकडून औरंगाबादच्या प्लायवूड विक्रेत्याची ४३ लाखाची फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 7:17 PM

प्लायवूड खरेदी केल्यानंतर मालाचे पैसे न देता कंपनी बंद झाल्याचे सांगून मुंबईतील एका कंपनीने ४२ लाख ९७ हजार ३५७ रुपयांची फसवणूक केली.

औरंगाबाद:  शहरातील प्लायवूड विक्रेत्याकडून होलसेलदरात प्लायवूड खरेदी केल्यानंतर मालाचे पैसे न देता कंपनी बंद झाल्याचे सांगून मुंबईतील एका कंपनीने ४२ लाख ९७ हजार ३५७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात मुंबईतील किटप्लाय  कंपनीच्या व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.  

सुनील अरोरा असे आरोपी व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, बीडबाय परिसरातील विवेक ओमप्रकाश धानुका हे प्लायवूडचे ठोक विक्रेता आहेत. त्यांचे खोकडपुरा आणि बायपास येथे प्लायवूडचे दुकान आहे.  २०१५ मध्ये त्यांच्या दुकानात ओळखीचे गणेश देसाई आणि आरोपी सुनील अरोरा आले होते. देसाई यांनी अरोरा यांची ओळख मुंबईतील किटप्लाय कंपनीचे व्यवस्थापक अशी करून दिली होती. किटप्लाय कंपनी बाजारात प्लायवूड खरेदी करून त्यांचे ब्रॅण्डींग करून  विक्र ी करायची. त्यामुळे अरोरा यांनी तक्रारदार धानुका यांच्याकडून २०१५ ते २०१७ या कालावधीत बऱ्याचदा माल खरेदी केला. खरेदी केलेल्या मालाची ते अर्धवट रक्कम देत आणि पुन्हा नवीन माल मागवित.

मोठा ग्राहक असल्याने धानुका त्यांना काही दिवसाच्या उधारीवर माल देत. सुरवातीला  त्याने १ कोटी ३३ लाख ४९ हजाराचा माल खरेदी केला. त्याबदल्यात ६९ लाख ६६ हजार ७८८रुपये मार्च २०१६ मध्ये धानुकांना दिले. थकबाकी असताना २०१६-१७मध्ये आरोपींनी पुन्हा १ कोटी ५१ लाख ८१ हजार ३३ रुपयांचा माल खरेदी केला. त्याबदल्यात १ कोटी ३९ लाख ५८ हजार ४३४ रुपये मार्च २०१७ मध्ये तक्ररदारांना दिले. आरोपीकडे ६२ लाख ९७ हजार ३५१ रुपये थकबाकी होते. यानंतर आरोपीने पुन्हा २० लाख रुपये धानुकांना दिले. उरलेले ४२ लाख ९७ हजार  ३५१ रुपये द्यावे, यासाठी धानुका सतत आरोपीकडे पाठपुरावा करीत होते.

आरोपीने त्यांना सांगितले की, त्यांची कंपनी तोट्यात गेल्याने बंद करण्यात आली. त्यानंतर आरोपी सुनील अरोराने तक्रारदार यांना प्रतिसाद दिला नाही. एवढेच नव्हे तर त्याने त्यांच्या मोबाईल नंबरवरून येणारे सर्व फोन कॉल अडविले. तक्रारदार यांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने त्याच्या किटप्लाय कंपनीचे नाव बदलून त्याच ठिकाणी दुसरी कंपनी सुरू केल्याचे समजले. यामुळे त्यांनी याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसfraudधोकेबाजी