शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जायकवाडीत धरणात ४२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:38 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन टीएमसीने भर पडली आहे.

पैठण : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्ग वाढविण्यात आल्याने जायकवाडीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी धरणात ३३०७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक होत होती. धरणाचा जलसाठा ४२ टक्के झाला असून गेल्या २४ तासात धरणात पावणेतीन टीएमसीने भर पडली आहे.वरील धरणातून होणारे विसर्ग आज घटविण्यात आले आहेत. विसर्गात झालेली घट लक्षात घेता जायकवाडी धरणात येणारी आवक कमी होण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नाशिक व नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाऊस उघडला असून गेल्या २४ तासात त्र्यंबकेश्वर २० मि.मी., इगतपुरी ६२ मि. मी., घोटी ४० मि. मी. याच ठिकाणी पाऊस झाला. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे.दारणा १८००, गंगापूर १५६०, पालखेड २२१३ क्युसेक्सपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला. या सर्व धरणाचे पाणी नांदूर -मधमेश्वर बंधाऱ्यात जमा होते. नांदूर -मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात काल २०२४४ क्युसेक्स एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत होता, तो आज १११५२ क्युसेक्सपर्यंत घटविण्यात आला. यामुळे गोदावरीचा पूर ओसरत आहे.नाशिक जिल्ह्यातील धरणाप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातूनसुध्दा विसर्ग घटविण्यात आला आहे. भंडारदरा २०३७, निळवंडे ६३०० व ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात ६३०१ क्युसेक्स असा विसर्ग आज ठेवण्यात आला.गुरुवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १५०८.६८ फूट झाली असून धरणात एकूण जलसाठा १५९४.७२४ दलघमी (५६.३१ टीएमसी) तर जीवंत जलसाठा ८५६.६१८ दलघमी ( ३०.२४ टीएमसी)एवढा झाला होता.

टॅग्स :DamधरणWaterपाणी