शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सौर ऊर्जा प्रकल्पातून रोज ४० हजार युनिट वीजनिर्मिती; अखंड वीजेमुळे शेतकऱ्यांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 18:36 IST

भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

- बाबासाहेब धुमाळवैजापूर : पीक उत्पादक शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसभरात पूर्ण क्षमतेने अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील भादली व धोंदलगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांमधून ४० हजार युनिट वीजनिर्मिती होत असून, याद्वारे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील भादली व धोंदलगाव येथे सौर उर्जा प्रकल्प उभारला आहे. यासाठी भादली प्रकल्पासाठी १८ कोटी व धोंदलगावसाठी १२ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. आता हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाले असून, भादली प्रकल्पातून दरराेज ५ मेगावॅट (२५ हजार युनिट) व धोंदलगाव प्रकल्पातून रोज ३ मेगावॅट (१५ हजार युनिट) वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्राप्त वीजसाठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित स्वरूपात वीजपुरवठा मिळत असल्याने त्यांच्यासाठी हा सौरऊर्जा प्रकल्प मोठा उपयुक्त ठरला आहे. जवळपास २० गावांतील कृषी पंपधारक ग्राहकांना या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विभाग दोन यांच्या कार्यक्षेत्रातील भादली उपकेंद्रासाठी १४ हेक्टर व धोंदलगावसाठी १३ एकर जमिनीमध्ये केंद्र सरकारच्या EESL, तसेच राज्य सरकारच्या MSEDCL मार्फत या प्रकल्पांची उभारणी करण्यात आली.

भारनियमनामुळे रात्रीच्या वेळी उपलब्ध होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर राज्य सरकारने दिलेल्या या प्रकल्पांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळत असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वैजापूर तालुक्यातील या गावांना होतो वीजपुरवठाभादली सौर उर्जा प्रकल्प : भादली, तलवाडा, पाराळा, मन्याड, चिकटगाव, वडजीधोंदलगाव प्रकल्प : धोंदलगाव, मालेगाव, जमनवाडी, अमनाथपूरवाडी, बाभूळगाव, पाथरी, राहेगाव, संजरपूरवाडी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रelectricityवीजFarmerशेतकरी