शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात आल्या ४० लाख वह्या; दोन महिन्यांत होणार १३ कोटींची उलाढाल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 22, 2023 12:36 IST

नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी जोरात

छत्रपती संभाजीनगर : नवीन शैक्षणिक वर्षाला जून महिन्यापासून सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने शालेय साहित्यांच्या बाजारपेठेत मोठ्या उलाढालीला सुरुवात झाली आहे. आजघडीला ४० लाख वह्या, रजिस्टर शहरात दाखल झाली आहेत. त्यांची किंमत १५ कोटींच्या आसपास आहे. पुढील ‘मे व जून’ या महिन्यांत ८० टक्के वह्या विक्री होतील. म्हणजेच १३ कोटींची उलाढाल या काळात होईल.

मुंबई, जालनातील उत्पादकांच्या वह्या४० लाख वह्या, रजिस्टर बाजारात आले आहेत. यातील ही ८० टक्के वह्या, रजिस्टर हे मुंबईहून, तर उर्वरित २० टक्के वह्या जालन्यातील उत्पादकांकडून आणण्यात आल्या आहेत. मुंबईतील नामांकित उत्पादकांच्या वह्या शहरात जास्त विकल्या जातात.

६० दिवसांत ३२ लाख वह्याजिल्हा व्यापारी महासंघाचे सहसचिव सुनील अजमेरा यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला २ डझन वह्या घ्याव्या लागतातच. ४० लाख वह्या बाजारात आल्या असल्या तरी पुढील ६० दिवसांत यातील ३२ लाख वह्या विकल्या जातील. त्यानंतर शिल्लक ८ लाख वह्या दिवाळीपर्यंत विकतील.

२० टक्कांपर्यंत वाढल्या किमतीकागद्याच्या किमती वाढल्याने वह्यांच्या किमती २० टक्यांपर्यंत वाढल्या आहेत. 

वह्या व रजिस्टरचे बाजारातील साधारण भाव असे.किती पानी वही एप्रिल २०२२ (प्रतिनग) एप्रिल २०२३१०० पानी वही २५ रु. -------३० रु.२०० पानी वही ५० रु. ------६५ रु.२०० पानी रजिस्टर ६० रु. -----७५ रु

यंदा पाने तेवढीच ठेवली, किमती वाढविल्यादरवर्षी पाने कमी करून वह्यांच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न उत्पादक करीत असतात. मात्र, आता पाने आणखी कमी करता येत नाही, यामुळे यंदा पाने तेवढीच ठेवून किमती वाढविण्यात आल्या आहेत.

खाकी रंगाच्या मुखपृष्ठाला मागणीपूर्वी वह्यांच्या मुखपृष्ठावर कार्टून, वाहनाचे, निसर्गाचे छायाचित्र असे. त्यावर खाकी रंगाचे कव्हर घातले जात. मात्र, आता खाकी रंगाच्या कव्हर सारखे प्रिंटच मुखपृष्ठावर असते.

२०० पानी रजिस्टरच सुपर हिट१०० पानी वह्यांपेक्षा २०० पानी रजिस्टर सुपर हिट आहेत. कारण, शाळा असो वा खासगी शिकवणी, दोन्ही ठिकाणी २०० पानांचे रजिस्टर चालते. यामुळे ७० टक्के रजिस्टर, तर ३० टक्के वह्या विकल्या जातात.

स्टेपल बँडिंगपूर्वी वह्यांना दोऱ्याची बांधणी केली जात होते. मात्र, आता स्टेपल बँडिंगचा जास्त वापर केला जात आहे. यामुळे वह्यांची पाने वेगवेगळी होत नाहीत, असे उत्पादकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण