शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पिकअपमध्ये वर कुलर आत ४ लाखाची व्हिस्की; मद्य तस्करीच्या मास्टरमाइंडसह दोघे अटकेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 20:02 IST

crime news गेवराई ( बीड ) येथून व्हिस्की दारूची वाहतूक  पैठण तालुक्यात होणार असल्याची खबर उत्पादन शुल्क निरीक्षक शरद फटांगडे यांना मिळाली होती.

ठळक मुद्दे दारूच्या (व्हिस्की) ४ लाख रूपयाच्या ११५२ बाटल्यासह दोन मद्य तस्करांना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलेयानंतर तस्करीचा प्रमुख सुत्रधार असलेला गेवराईचा रामेश्वर हातोटे यास पोलिसांनी ताब्यात घेतले

पैठण : गोवा राज्यात विक्रीचा परवाना असलेल्या दारूच्या (व्हिस्की) ४ लाख रूपयाच्या ११५२ बाटल्यासह दोन मद्य तस्करांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुद्देमालासह  अटक केली आहे. पैठण औरंगाबाद रोडवर कौडगाव बीडकीन दरम्यान बुधवारी ही कारवाई करण्यात आली. मद्य तस्करीचा प्रमुख सुत्रधार असलेला गेवराईचा रामेश्वर हातोटे यास या प्रकरणात गेवराई येथून ताब्यात घेतल्याचे उत्पादन शुल्क निरीक्षक शरद फटांगडे यांनी सांगितले. 

गेवराई ( बीड ) येथून व्हिस्की दारूची वाहतूक  पैठण तालुक्यात होणार असल्याची खबर उत्पादन शुल्क निरीक्षक शरद फटांगडे यांना मिळाली होती. यानुसार सुधाकर कदम अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद फटांगडे,  दुय्यम निरीक्षक आगळे व रोटे , जवान विजय मकरंद , अमोल अन्नदाते , राजु अंभोरे , हर्षल बारी व नवनाथ घुगे यांनी पैठण ते बीडकीन दरम्यान ठिकठिकाणी सापळे लावले होते. मध्यरात्रीच्या सुमारास धम्मा भिमा वक्ते व गणेश अच्युतराव लहाने ( रा. पाचेगाव  ता गेवराई , जि . बीड ) हे दोघे पिकअप जीपने (एम.एच १७ के ९७६२)  परराज्यात विक्री करिता असलेला विदेशी मद्यसाठा बेकायदेशिरपणे बाळगून बिडकीनच्या दिशेने सुसाट निघाले होते. जीप बिडकिनच्या दिशेने येत असल्याने बीडकीन परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सदर जीपला अडथळा करून निरीक्षक शरद फटांगडे यांनी थांबवून जीप मधील दोघांना ताब्यात घेतले. जीपमध्ये गोवा राज्यात विक्रीचा परवाना असलेला तसेच गोवा राज्यात महसूल जमा केलेला हिस्की दारूच्या ( १८० मि.ली. क्षमता )  विविध बॅच क्रमांकाच्या ११५२ सिलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर मद्य तस्करीचा सुत्रधार गेवराई येथील रामेश्वर बळीराम हातोटे असल्याचे समोर येताच विभागीय उपायुक्त प्रदिप पवार यांनी बीड विभागाला सूचना देऊन रामेश्वर हातोटे यास अटक करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पाचेगाव ( ता. गेवराई ) येथून रामेश्वर हातोटे यास अटक करण्यात आली. या प्रकरणी रामेश्र्वर हातोटेसह जीप मधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वरून कुलर आतून दारूमद्य तस्करी करण्यासाठी जिपमध्ये १ फुट उंचीचा लोखंडी पत्रा टाकून कप्पा तयार करण्यात आल्याचे दिसून आले या कप्प्यावर जुने कुलर व लोखंडी रॅक ठेवण्यात आले होते. प्रथम दर्शनी जीप मधून कुलर व रॅकची वाहतूक होत असल्याचे दिसून आले मात्र त्याखालील कप्प्यात दारूच्या बाटल्या लपविण्यात आलेल्या होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद