शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत ३६ वेळा रेल्वेची येजा; शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ वाहतूककोंडी, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 13:40 IST

बीड बायपास, देवळाई, बाळापूर परिसरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शहरात ये-जाणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्वाधिक वर्दळीचे शिवाजीनगर रेल्वेफाटक २४ तासांत ३६ वेळा चालूबंद केले जाते. रेल्वेगाडी फाटक ओलांडून जाईपर्यंत फाटक बंद केले जाते आणि दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. दिवसेंदिवस रांगा वाढतच आहेत. यामुळे फाटक परिसरातील दुकानदार आणि रहिवासी त्रस्त झाले आहे.

बीड बायपास, देवळाई, बाळापूर परिसरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शहरात ये-जाणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. नागरिकांना शिवाजीनगर रेल्वेफाटक ओलांडून शहरात ये-जा करावी लागते. रेल्वे आली की, प्रत्येकवेळी रेल्वेफाटक बंद केले जाते. फाटक बंद होताच शिवाजीनगरात वाहनचालकांच्या रांगा वाणी मंगल कार्यालयापर्यंत येतात. तर दुसऱ्या बाजूला देवळाई चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. विशेषत: सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या कालावधीत या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. या रांगेतून पुढे जाण्यासाठी काही वाहनचालकनियम पाळत नाही. अशावेळी वाहतूककोंडी निर्माण होते. बऱ्याचदा रेल्वे गाडीचे फाटक बंद होत असल्याचे समजताच देवळाई चौकातील वाहतूक पोलीस फाटकाजवळ येतात आणि वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करतात. पावसाळा समाप्त झाल्यापासून देवळाई चौक ते शिवाजीनगर रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे अनेक दुकानदारांनी त्यांची दुकाने दुसरीकडे स्थलांतरित केली आहेत. मसाले आणि ड्रायफ्रुट विक्रेता मोगल यांनी सांगितले की, येथे तातडीने भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. हे काम झाल्याशिवाय आमचा त्रास कमी होणार नाही.

वाहनचालकांची फाटकाखालून घुसखोरीरेल्वेफाटक लागल्यानंतरही अनेक वाहनचालक फाटकाखालून त्यांचे वाहन टाकतात, रेल्वेरूळ ओलांडताना जीव धोक्यात टाकतात, असे रेल्वेचे कर्मचारी रामेश्वर जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले की, नागरिक खूप घाई करतात. आजही एका महिलेची मोपेड अडकून पडली होती. तेव्हा त्या घाबरल्या होत्या. मात्र, नागरिकांनी त्यांना मदत केल्याने त्यांना त्यांचे वाहन फाटकाखालून बाहेर काढता आले.

टॅग्स :railwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबाद