शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Waqf land Scam: मराठवाड्यात वक्फच्या ३५ हजार एकर जमिनी भूमाफियांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 12:10 IST

Waqf land Scam in Marathwada बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या सुमारे ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा ( Waqf land Scam in Marathwada) केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे (35,000 acres of Waqf land in Marathwada under the control of land mafia). बीडमध्ये ४०९ एकर जमीन हडपण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर वक्फच्या जमिनींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विभागात वक्फची ५५ हजार एकरच्या आसपास जमीन असल्याचा अंदाज आहे.

वक्फच्या जमिनींची नोंद सातबाऱ्यात येण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र वक्फकडून जाेपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्याची महसुली नोंद होत नाही. त्यामुळे वक्फ आणि महसूल यांच्या ‘मिलीभगत’ने या जमिनी हडपल्या जात असल्याचे दिसते आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात वक्फच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरित जिल्ह्यात थोड्या-अधिक प्रमाणात आहेत. औरंगाबादमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणच्या वक्फच्या जमिनींवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याबाबत आजवर कोणताही सर्व्हे बोर्डाने केलेला नाही. मनुष्यबळ, पैसा, अधिकारांची वानवा असल्याने बोर्डाचे घोडे अडलेले आहे. याचा फायदा घेत अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जमिनी हडपल्या जात आहेत.

मध्यंतरी वक्फच्या सीईओंनी महसूल विभागाला पत्र दिले होते. महसूलमधील यंत्रणेला हाताशी धरून जमिनी हडपल्या जात आहेत, असा सूर त्यांनी पत्रातून आळविला होता. त्या पत्रावरून महसूल प्रशासनात प्रचंड वादळ उठले असले तरी बीडमधील तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक, मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदारांसह १५ जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे सीईओंच्या पत्रात तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे.

वक्फच्या जमिनींची लवकरच पाहणीजमिनींची लवकरच पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर किती जमिनी हडपल्या गेल्या, त्याची माहिती समोर येईल. राज्यात ९७ हजार एकर जमीन आहे. त्यातील सुमारे ७० टक्के जमीन अतिक्रमित झाल्याचा अंदाज आहे. वक्फ बोर्डातील काही जणांना हाताशी धरूनच हा सगळा प्रकार सुरू आहे. जमिनी सांभाळण्याचे आव्हान आहे. कर्मचारीवर्ग, पैसा, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. त्यामुळे अतिक्रमणे वाढत आहेत.-अनिस शेख, सीईओ वक्फ बोर्ड औरंगाबाद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाEnchroachmentअतिक्रमण