शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

३५00 शिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:36 IST

जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्या हव्यात, बदल्या नको, या वादावर आज अखेर एकदाचा पडदा पडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘लॉगइन’वर सकाळपासून जवळपास साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले; पण मुख्य कार्यकारी अधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांची बदल्यांना मान्यता मिळाली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्या हव्यात, बदल्या नको, या वादावर आज अखेर एकदाचा पडदा पडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘लॉगइन’वर सकाळपासून जवळपास साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले; पण मुख्य कार्यकारी अधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांची बदल्यांना मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे बदल्यांच्या आदेशाबाबत शिक्षणाधिका-यांनी दिवसभर गोपनीयता बाळगली. दुसरीकडे, बदलीचे आदेश घेण्यासाठी सकाळपासून हजारो शिक्षकांनी जि. प. शिक्षण विभाग, सर्व पंचायत समित्यांमधील गटशिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर गर्दी केली होती. अखेर बदलीच्या आदेशाविनाच सायंकाळी शिक्षकांना घराकडे परतावे लागले.गेल्या वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या गाजत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या मध्यात बदल्या नकोत म्हणून नोव्हेंबरमध्ये बदल्यांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यानंतर जानेवारीपासूनच नव्याने बदल्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिक्षकांमध्ये अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र, असा वाद उफाळून आला. यामध्ये शिक्षकांचे बदली हवी- बदली नको, असे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. या दोन्ही गटांनी राज्यभर मोर्चे काढून शक्तिप्रदर्शनही केले. असे असले तरी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काहीही झाले, तरी यंदा बदल्या करणारच, असा पवित्रा घेतला आणि आज अखेर औरंगाबाद जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत सुमारे ३ हजार ५०० शिक्षकांचे बदली आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या ई-मेलवर येऊन धडकले.हजारो शिक्षकांची बदल्यांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर या शासकीय कामकाजानिमित्त दोन दिवसांपासून दिल्ली येथे आहेत. त्यामुळे शिक्षणाधिका-यांना आज सोमवारी सायंकाळपर्यंत बदल्यांसाठी त्यांची मान्यता घेता आली नाही. त्यामुळे सकाळपासून बदली आदेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा हिरमोड झाला. दरम्यान, ‘सीईओ’ कार्यालयाच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सकाळीच १५ ते २० कर्मचारी- अधिका-यांच्या पथकासह अज्ञातस्थळ गाठले. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हिंदी विद्यालयात संपूर्ण पथकाने दिवसभर साडेतीन हजार शिक्षकांच्या बदली आदेशाच्या चार- चार प्रती डाऊनलोड केल्या. त्यावेळी शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी स्वत:चा मोबाईल दिवसभर बंद करून ठेवला होता. सोबतच्या कर्मचा-यांनाही बदल्यांसंबंधी गोपनीयता बाळगण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे बदली झाली खरी; पण कोणत्या शाळेवर झाली. पती-पत्नी एकत्रीकरणाचा फायदा मिळाला की नाही, बदल्यांमुळे कोणते व किती शिक्षक विस्थापित झाले, हे शिक्षकांच्या मनातील सर्व प्रश्न दिवसभर अनुत्तरितच राहिले.शिक्षकाने बदलीसाठी २० शाळांचे पर्याय दिल्यानंतर त्यापैकी एकाही शाळेवर त्याची बदली झाली नाही. मात्र, त्याच्या जागेवर बदलीने दुसरा शिक्षक आल्यामुळे तो विस्थापित झाला आहे. आजच्या या बदली आदेशामध्ये जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक शिक्षक विस्थापित झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.४विस्थापित शिक्षकांना संवर्ग-५ अंतर्गत पुन्हा २० शाळांचे पर्याय दिले जाणार आहेत. उद्यापासून पोर्टलवर लगेच विस्थापित शिक्षकांना आॅनलाईन पर्याय देता येतील. त्यानंतरही त्यांना दिलेल्या २० पर्यायांपैकी एकही शाळा मिळाली नाही, तर मग शिक्षण विभाग त्या शिक्षकाची कोणत्याही शाळेत रिक्त जागेवर बदली करणार आहे.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदTeacherशिक्षक