शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

३५ एमएलडी पाणी टँक र लॉबीच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:19 IST

शहरात येणाऱ्या १२६ एमएलडीपैकी तब्बल ७० एमएलडी म्हणजेच ५८ टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती दस्तुरखुद्द महापालिकेच्या अधिका-यांनी समोर आणली आहे. यातील अर्धे पाणी टँकर लॉबी पळवीत आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात येणाऱ्या १२६ एमएलडीपैकी तब्बल ७० एमएलडी म्हणजेच ५८ टक्के पाण्याची गळती होत असल्याची माहिती दस्तुरखुद्द महापालिकेच्या अधिका-यांनी समोर आणली आहे. यातील अर्धे पाणी टँकर लॉबी पळवीत आहे. हॉटेल, हॉस्पिटल, बिल्डरांना ते पाणी सर्रासपणे पुरविले जात आहे. लोकमतने तीन दिवस केलेल्या पाहणीतून ही माहिती समोर आली आहे.एन-५, कोटला कॉलनी, एन-७ येथील जलकुंभावरून भरल्या जाणा-या टँकरचे पाणी कुठे मुरते याचा तपास आणि चौकशीची गरज निर्माण झाली आहे. शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळविणा-या या टँकर लॉबीला पालिकेतील काही गब्बर अधिकारी आणि पदाधिका-यांची मदत असण्याची दाट शक्यता आहे. सिडको-हडकोसह नवीन शहराला एन-५ जलकुंभ तथा पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा होतो. या स्टेशनवरून किती टँकर भरले जातात. त्यात किती टँकरवर क्रमांक आहे. पालिकेचे किती टँकर आहेत. खाजगी टँकर किती भरले जातात, याची पारदर्शक नोंद तेथे होत नाही.लोकमतच्या टीमने काही टँकरचा पाठलाग केला असता असे समोर आले की, एक टँकर खाजगी होते. ते पंपिंग स्टेशनवर भरले गेले. परंतु ते नागरी वसाहतीमध्ये जाण्याऐवजी एका हॉटेलवर रिकामे झाले. काही हॉस्पिटल्सचे टँकर तेथे सर्रासपणे भरले जात होते. काही टँकरना क्रमांक नव्हता, त्यामुळे त्यांची नोंद होत नव्हती.अधिका-यांनी गेल्या आठवड्यात एका बैठकीत पदाधिका-यांना ७० टक्के पाण्याची चोरी होत असल्याचे सांगितले. शहरात अडीच महिन्यांपासून पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो आहे. रात्री-अपरात्री पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरात येणा-या पाण्याचे वितरण कसे केले जाते, याचा हिशेब प्रशासनाकडे नाही. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाणी प्रश्न गांभीर्याने जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शुक्रवारी पाणीपुरवठ्याबाबत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना काही माहिती विचारली. शहरात येणा-या १२६ पैकी ७० एमएलडी पाण्याचा हिशेब लागत नसल्याचे कोल्हे यांनी आयुक्तांना सांगितले. पाईपलाईनला लागलेल्या गळत्या, बेकायदा नळांना हे पाणी जात असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला असला तरी टँकर लॉबीकडून किती पाणी पळविले जाते आणि पुरविले जाते, याची काहीही माहिती त्यांना आयुक्तांना देता आली नाही.टँकर फे-यांचे रेकॉर्ड बनावट असण्याची शक्यताशेख मुजीम/ विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन-५ येथील जलकुंभावरून महापालिका शहरातील गुंठेवारी भागात पाणीपुरवठा करते. त्या पंपिंग स्टेशनवरील अधिकारी टँकरचे रेकॉर्ड ठेवण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी टँकर कंत्राटदार तेथील कर्मचा-यांना हाताशी धरून नागरिकांच्या वाट्याचे पाणी बड्या हॉटेल्सना विकत असल्याची माहिती लोकमत चमूने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. घरासमोर ठेवलेल्या ड्रममध्ये टँकरने पाणी दिले जाते. ड्रमजवळच टँकर उभे राहत असल्यामुळे टँकरला मोठा पाईप किंवा मोटारीची गरज नसते. परंतु काही टॅँकर उंच इमारत किंवा हॉटेलमध्ये पाणी पुरवितात. त्यांना १५ ते २० फुटांचे पाईप आणि मोटार असल्याचे आढळून आले आहे. जलकुंभावरून खाजगी वॉटर सप्लायरचे टँकर रोज शहरातील हॉटेल्सला पाणी विकत असल्याचा पुरावा लोकमत टीमच्या हाती लागला आहे. त्या टँकरचा पाठलाग केला असता सिडको चौकातील एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये ते टँकर खाली केले. टँकरवर लिहिलेल्या नंबरवर संपर्क केला असता पिण्याचे पाणी ५०० तर वापरण्यासाठी विहिरीचे पाणी ४०० रुपयांत मिळेल, असे उत्तर सदरील टीमला देण्यात आले.मनपाचा एमएच-२० सीआर ६४१५ हा टँकर एसएफएससमोर असलेल्या एका इमारतीमध्ये पाणी विकण्याच्या तयारीत होता. मात्र त्याने लोकमतच्या प्रतिनिधीला बघितले असता टँकरखाली न करता त्याने तेथून धूम ठोकली.मनपाच्या यंत्रणेला लोकमतचे प्रतिनिधी पाहणी करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पंपिंग स्टेशनवर फक्त पालिकेचेच टँकर भरण्यास सुरुवात केली.तीन दिवसांच्या पाहणीत तफावतजलकुंभावर बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसांत लोकमतची टीम लक्ष ठेवून होती. या तीन दिवसांत या टँकर भरण्यात मोठी तफावत असल्याचे आढळून आले. बुधवारी सकाळी सहा ते रात्री साडेसहा या वेळेत या जलकुंभावरून एकूण २४५ टँकर पाण्याने भरून गेले.कार्यकारी अभियंता म्हणाले...कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या कानावर टँकर लॉबीकडून होत असलेल्या घोळाची माहिती टाकली असता ते म्हणाले, शहरातील सर्व फिलिंग स्टेशनवर मी स्वत: पाहणी करतो आहे. मलादेखील संशय येत असून या प्रकरणाच्या पूर्ण खोलात जाणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका