शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन दिवसांत पकडल्या ३१८ वीजचोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:27 IST

महावितरणने औरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देमहावितरण : ७ जूनपर्यंत चालणार मोहीम

औरंगाबाद : महावितरणनेऔरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या धडक मोहिमेच्या अवघ्या दोनच दिवसांत वीजचोरीची तब्बल ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.वाढत्या तापमानामुळे विजेची मागणी वाढलेली आहे. अशावेळी आकडे टाकून किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करतात. या सगळ्यातून वीजचोरीमुळे विद्युत यंत्रणेवर ताण येऊन रोहित्रे नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबरोबरच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीसाठी तात्पुरता खंडित केलेला आहे, असे ग्राहकही चोरून वीज वापरण्याची शक्यता असते. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांत विशेष पथके नेमून २ ते ७ जूनदरम्यान वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व अभियंते-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. या मोहिमेत २ व ३ जून या दोनच दिवसांत वीजचोरीची ३१८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. या सर्व ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.मीटरमध्ये छेडछाड, आकडे टाकलेऔरंगाबाद शहर मंडळात ३१, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १४६, तर जालना मंडळात वीजचोरीची १४१ प्रकरणे उघडकीस आली. ३१८ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची १८ प्रकरणे उघडकीस आली, तर मीटरमध्ये छेडछाड, आकडा टाकून थेट वीजचोरी केल्याची ३०० प्रकरणे आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारी