शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

३०:३० घोटाळ्याची व्याप्ती वाढली; महिन्याला १५ टक्के रिटर्नचे आमिष दाखवून २ कोटींना फसवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:13 IST

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात गाजलेल्या ३०:३० घोटाळ्याचे लोण शहरातही पोहोचले आहे. मुख्य आरोपीसह चौघांनी शहरातील दोघांची १ कोटी ९५ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेने चार पैकी दोन आरोपींना अटकही केली आहे.

आरोपीमध्ये ३० : ३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष ऊर्फ सचिन नामदेव राठोड (रा. पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास), एजंट राजेंद्र ऊर्फ पंकज प्रल्हाद जाधव (रा. लिंक रोड, गोलवाडी), सुहास पंडित चव्हाण (रा. बंजारा कॉलनी) आणि अमोल कृष्णा चव्हाण (रा. नाईकनगर, बीड बायपास) अशी आरोपींचे नावे आहे. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात प्रमोद पंडित जाधव ( रा. बंजारा कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मामेसासरे असलेले एजंट राजेंद्र जाधव यांनी ३०:३० घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष राठोड यास फिर्यादीला भेटण्यास नोव्हेंबर २०२० मध्ये घेऊन आले. त्यांनी ३० : ३० योजनेविषयी माहिती दिली. त्यात केलेल्या गुंतवणुकीवर महिन्याला १५ टक्के रिटर्न देण्याचे आमिष दाखवले. त्याविषयीची माहिती पुस्तिकाही दिली. त्याशिवाय या योजनेत गुंतवणूक केलेल्या अनेकांची नावेही सांगितली. त्यावर विश्वास बसल्यामुळे आरोपी संतोष राठोड व राजेंद्र जाधव यांच्या बँक खात्यात गुंतवणूक करण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे दिली. काही रकमेवर सुरुवातीला १५ टक्के परतावा देण्यात आला. मात्र, नंतर टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चारपैकी राजेंद्र व सुहास हे दोन आरोपी पकडले.

फिर्यादीच्या चुलत भावास १ कोटी ४५ लाखांना फसवलेफिर्यादी प्रमोद जाधव यांचे चुलत भाऊ राजेंद्र जाधव यांनाही संतोष व सुहास या दोघांनी ३०३:३० योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी गुंतवणूक करारनामा करून दिला. त्यामुळे राजेंद्र जाधव यांन आरोपी सुहास चव्हाणच्या बँक खात्यात ९५ लाख रुपये आणि संतोष राठोडच्या बँक खात्यात ५० लाख रुपये असे १ कोटी ४५ लाख रुपये पाठवले होते. या पैशाचा कोणताही परतावा गुंतवणूकदारास मिळाला नाही, उलट फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेची बनावट ऑर्डर दाखवलीफिर्यादीसह त्यांच्या चुलत भावाने गुंतवणूक केलेल्या पैशासह परताव्यासाठी आरोपींकडे तगादा लावला. तेव्हा आरोपीने रिझर्व्ह बँकेकडून ३०० ते ३५० कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगून, रिझर्व्ह बँकेची रिलिजिंग ऑर्डरची प्रत पाठवली. त्यात एकूण २८ लोकांची नावे आहेत. ऑर्डरची बनावट असल्याचे कळताच फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.

बिडकीन ठाण्यात दाखल होता गुन्हाबिडकीन पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष राठोडसह इतरांच्या विरोधात ३०:३० घोटाळ्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होता. संतोष वर्षभर कारागृहात होता. मात्र, साक्षीदार उलटल्यामुळे त्यास जामीन मिळाला होता.

पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनफसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी केले. राजेंद्र व सुहास या आरोपींना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी