शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३० कोटी घेऊन ‘कृत्रिम’ पावसाचे विमान उडाले; 'पाऊस' पडला हे गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 19:50 IST

प्रयोगातून किती पाऊस पडला हे गुलदस्त्यात

ठळक मुद्देकृत्रिम पावसाचा प्रयोग संपला ९३३ फ्लेअर्स पाणीदार ढगांत सोडले 

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठी ख्याती वेदर मॉडिफिकेशनने ९ आॅगस्टपासून  सुरू केलेला प्रयोग थांबविण्यात आला आहे. ३० कोटी रुपये घेऊन प्रयोगासाठी आलेले विमान उडाले आहे. तत्पूर्वी शास्त्रज्ञांनी औरंगाबाद सोडले. ५२ दिवसांसाठी हा प्रयोग करण्याचा करार होता. ९ नोव्हेंबरपर्यंत प्रयोग सुरू होता. प्रयोग थांबविण्यात आल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालक विभागाकडून सांगण्यात आले. 

तीन महिन्यांतील प्रयोग काळात ९३३ फ्लेअर्स पावसासाठी राज्यातील विविध भागांत सोडण्यात आले. विमान उड्डाणावर उड्डाण घेत राहिले, त्यातून किती पाऊस पडला, याचा अहवाल महसूल प्रशासन आणि शास्त्रज्ञांनी दिला नाही. आॅक्टोबर महिन्यात झालेला पाऊस हा कृत्रिम होता की, नैसर्गिक याचेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ३० कोटी रुपयांतून हा प्रयोग करण्यात आला. आता त्या प्रयोगाची सांगता झाली असली तरी अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आलेली नाही. आयुक्तालयाच्या चौथ्या मजल्यावर बसविण्यात आलेले रडार अजून तसेच आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ९ आॅगस्टपासून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण करीत रसायनांची फवारणी केली. ९० दिवसांत ३५ दिवस प्रयोग झाला नाही. विमान व पायलटस्ने रेस्ट डे किंवा पाणीदार ढगं नसल्याच्या कारणाने ३५ दिवस उड्डाण केले नाही. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकारी यंत्रणेने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाकडे लक्ष दिले नाही. दरम्यान परतीच्या पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली. परतीचा पाऊस ज्या भागात पडला नाही, ज्या भागात पाऊस झाला नाही, त्या ठिकाणी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी विमानाने उड्डाण घेतले. 

प्रयोगातून किती पडला पाऊस?कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ९ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. १६ आॅगस्टपासून कंपनीच्या विमानाचे प्रयोगासाठी नियमित उड्डाण झाले. ९ आॅगस्टपासून हिशेब केला तर आजवर ९० दिवस प्रयोगाचे झाल्याचे दिसते. ९ आॅगस्ट ते १ सप्टेंबर,  १ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबरअखेरपर्यंत ९३३ फ्लेअर्स विमानातून कृत्रिम पावसासाठी ढगांमध्ये सोडण्यात आले.४औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, बुलडाणा, सोलापूर या जिल्ह्यांतील गावांवरील पाणीदार ढगांमध्ये प्रयोग करण्यात आला. या प्रयोगातून किती पाऊस पडला, याची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी सांगितले की, प्रयोग संपल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु प्रयोग थांबविण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद