शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज उद्योगनगरीत ३ गोदाम आगीत भस्मसात; ५० लाखांच्या नुकसानीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 20:14 IST

शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज

- मेहमूद शेख

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत आज सांयकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तीन गोदामांना अचानकआग लागली होती. या आगीत तिन्ही गोदामातील जवळपास ५० ते ६० लाखो रुपये किमंतीचे साहित्य भस्मसात झाले आहे.

वाळूज एमआयडीसीतील सी-सेक्टरमधील प्लॉट क्रमांक सी-२५२ मध्ये मोहम्मद आरिफ हुसैन पटणी (रा.औरंगाबाद) यांचे स्वास्तिक ट्रॉन्सपोर्टचे गोदाम व कार्यालय आहे. आज बुधवारी सांयकाळी ४.३० वाजेच्या सुमारास या ट्रॉन्सपोर्टच्या गोदामात अचानक आग लागली. आग लागल्यामुळे या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोदामातील प्लॉस्टिक व इतर मटेरियल्सने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुपधारण केले. काही वेळातच बाजूच्या वल्लभ ट्रेडर्स व पार्थ एंटरप्रायजेस या बॅटरीच्या गोदामांलाही आगीने वेढले. दरम्यान, माहिती मिळताच वाळूज येथील दोन अग्निशमन बंबानी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्नीशमन अधिकारी पी.के.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक हातवटे, एसबी.महाले, के.टी. सुर्यवंशी, सी.एस.पाटील, एस.बी.उखरे, वाय.डी.काळे, एस.बी.शेंडगे यांनी एक ते दिड तासांत आगीवर नियंत्रण मिळविले.

आगीत जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसानया आगीत स्वास्तिक ट्रॉन्सपोर्टमधील विविध कंपन्याचे मटेरियल्स जळून भस्मसात झाले असून आगीत जवळपास १५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज ट्रॉन्सपोर्टचे मोहम्मद पटणी यांनी केला आहे. वल्लभ ट्रेडर्सच्या गोदामातील ईन्व्हर्टर, सोलार पॅनल आगीत सापडून १५ ते २० लाखाचे नुकसान झाल्याचे प्रशांत दौलताबादकर यांचे म्हणणे आहे. तर पार्थ इंटरप्रायजेसच्या गोदामातील बॅटरी, सोलार पॅनल, सोलार युपीएस आदीसह फर्निचर व इतर साहित्य जळून जवळपास २० लाखाचे नुकसान झाल्याचे पुनम दौलताबादकर यांनी सांगितले. या तीन्ही गोदामात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज गोदाम मालकांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग