शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महापालिकेची बांधील खर्चाच्या नावावर ३ कोटींची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 19:15 IST

महापालिका आयुक्त नसताना लेखा विभागाचा कारभार

ठळक मुद्दे निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी झिजवताहेत उंबरठेबचत गटांच्या कामावरही खर्च

औरंगाबाद : महापालिका आयुक्त प्रदीर्घ रजेवर असल्याने महापालिकेतील लेखा विभागाने मागील दोन ते तीन दिवसांमध्ये बांधील खर्चाच्या नावावर तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा संपूर्ण निधीही बांधील खर्चाअंतर्गत येतो. मागील काही महिन्यांमध्ये निवृत्त झालेले कर्मचारी आजही मनपाचे उंबरठे झिजवत आहेत, हे विशेष.

मालमत्ताकर, पाणीपट्टी, नगररचना, अग्निशमन, उद्यान विभागाकडून दररोज लेखा विभागात लाखो रुपये जमा होतात. मागील आठवड्यात मनपाच्या अकाऊंटमध्ये फक्त ४८ लाख रुपये शिल्लक होते. या आठवड्यात तब्बल ३ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली. ही रक्कम मागील दोन ते तीन दिवसांमध्ये मोठमोठ्या कंपन्या, ठेकेदारांना देण्यात आली. बचत गटांना तब्बल ८३ लाख रुपये देण्यात आले. कचरा संकलन करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने १ कोटी ३९ लाखांचे बिल दिले होते. या कंपनीला दोन टप्प्यात ९६ लाख रुपये देण्यात आले. संगणक चालविण्यासाठी आॅपरेटर्स देणाऱ्या गॅलक्सी कंपनीलाही लाखो रुपये देण्यात आले. चिकलठाणा येथे १६ टन कचऱ्याच्या मशीनवर प्रक्रिया करणाऱ्या नागपूरच्या वेस्ट बिन सोल्युशन कंपनीला २० लाख रुपये देण्यात आले. याशिवाय आणखी काही कंत्राटदारांना बांधील खर्च म्हणून पैसे देण्यात आल्याची धक्कादायक बाब  समोर आली आहे. 

निवृत्त कर्मचारी रांगेतमहापालिकेतून निवृत्त झालेल्या ४० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेने निवृत्तीची रक्कम दिलेली नाही. फक्त भविष्य निर्वाह निधीची रक्कम देऊन बोळवण केली आहे. सुट्यांचे पैसे, अंशदान आदी रक्कम थकविली आहे. निवृत्त कर्मचारी दररोज लेखा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. महापालिकेत ज्या कर्मचाऱ्यांनी २८ ते ३० वर्षे सेवा केली त्याच कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे काम लेखा विभागाने सुरू केले आहे. आज खुर्चीवर बसलेले कर्मचारी, अधिकारी उद्या निवृत्त होणार नाहीत का? असा संतप्त सवाल निवृत्त कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना संपूर्ण रक्कम देणे हा बांधील खर्च नाही का? असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

बचत गटांच्या कामावरही खर्च

शहरातील कचरा संकलनाचे काम बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्यापूर्वी मनपा प्रशासनानेच सर्व वॉर्ड कार्यालयांमधील बचत गटांचे काम त्वरित थांबविण्यात येईल, असे जाहीर केले होते.४कंपनीचे काम सुरू होऊन सहा महिने उलटले तरी बचत गटांचे काम सुरूच आहे. बचत गटांवर कोट्यवधींचा खर्च, कंपनीवरही कोट्यवधींचा खर्च सुरू असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद