शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 19:46 IST

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते, औरंगाबाद, जालना,परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पैठण (औरंगाबाद): जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले असताना (९८.२४%) नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी जायकवाडी धरणात १,२०, ००० क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली. यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्व २७ दरवाजे ४ फूटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग १ लाख १३ हजार १८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. 

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवून औरंगाबाद ,जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विसर्ग दिड लाख क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणाची शक्यता धरण प्रशासनाने वर्तविल्याने शनिवारी सायंकाळी पैठणकरांचेही धाबे दणाणले. शहरात पाणी घुसेल या भितीने नदीकाठच्या भागासह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. शनिवारी दुपारनंतर गोदावरी नदी ४६००० व प्रवरा नदी ५७००० क्युसेक्सने भरून  जायकवाडी धरणात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे दुपारी पाच नंतर जायकवाडीतून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून सायंकाळी सात वाजेपर्यंत  १,१३,१८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे पैठण शहरातील नदीकाठचा सखल भाग, मोक्षघाट पाण्याखाली आले. ग्रामीण भागातील गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या नाले व ओढ्यातून पाणी उलटे प्रवाही झाले. 

दरम्यान, विसर्ग वाढविण्यात आला तर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातील भंडारदरा ५५३८, नीळवंडे १०९६०, ओझरवेअर २२१५१ व मुळा धरणातून १५००० क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला यामुळे प्रवरा नदीस महापूर  ( ५७८५४ क्युसेक्स) आला असून हे पाणी गतीने जायकवाडी धरणात दाखल होत होते. नाशिक जिल्ह्यात थोडा पावसाचा जोर कमी झाल्याने  दारणा ५९२४, कडवा ५००१, गंगापूर १६०८,पालखेड, ६३९४ व नांदुर मधमेश्वर वेअर मधून ३३५७६ क्युसेक्स विसर्ग तेथील धरण समुहातून करण्यात आले. परंतु नाशिक ते पैठण दरम्यान मुक्त पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरीसही (४६००० क्युसेक्स) पुर आला आहे दोन्ही नद्यांचे पाणी जायकवाडीत दाखल होण्यास प्रारंभ झाल्याने जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्याचा निर्णय शनिवारी दुपारनंतर घेण्यात आला. 

धरण भरून ठेवण्याचा अट्टाहास.....दिड लाख क्युसेक्स व त्यापेक्षा अधिक विसर्ग केल्यास पैठण शहरासह तालुक्यातील गोदाकाठच्या गावास पुराचा फटका बसतो. पुरनियंत्रणासाठी धरणात जागा ठेवावी अशी मागणी पैठणकर सुरवातीपासून करत आले आहेत. परंतु केवळ धरण १००%  भरून ठेवण्याच्या जायकवाडी प्रशासनाच्या अट्टाहासातून पैठण शहरावर पुराची टांगती तलवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दीड लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे पत्र समाजमाध्यमावर आल्यानंतर शहरातील व्यापारी धास्तावले.  दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे नियोजन व्यापाऱ्यांचे सुरू होते. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता नियंत्रित विसर्ग करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री अनील पटेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहीया, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, दत्ता गोर्डे, तुषार पाटील आदींनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद