शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

250 जॅक बसवून अख्खा बंगलाच उचलला वर; औरंगाबादमधील हाउस लिफ्टिंग ठरतेय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 07:37 IST

८ तासांत पायापासून उचलल्या अडीच फूट उंच भिंती

औरंगाबाद : अल्लाउद्दीनचा चिराग घासल्यावर त्यातून जीन बाहेर पडतो. ‘जिन हुं तुझे मै नही छोडूंगा’ असे म्हणत त्याने अख्खे घरच दोन हातांत उचलून घेतले. ही कल्पनिक कथा लहानपणी सर्वांनी वाचली असेल. मात्र, बीड बायपास रोडवरील सत्कर्म नगरातील   २ हजार स्क्वेअर फुटांचा ‘सावली’ हा  बंगला तब्बल अडीच फूट वरती उचलण्यात आला आहे. ही काही परिकथेतील जिनची कमाल नसून नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. या कामासाठी बिहारमधील १८ मजुरांनी प्रचंड मेहनत घेऊन  २५० जॅक लावून अवघ्या ८ तासांत जमिनीपासूनबंगला अडीच फूट वरती उचलला. ‘सावली’ नावाचा हा बंगला पायथ्यापासून (बेसमेंट) ४ फूट उंच उचलण्यात येणार आहे.   

२ हजार स्क्वेअर फूटमध्ये संजय  गडाप व आनंद कुुलकर्णी यांचा बंगला आहे. हा बंगला उतारावर आहे. पावसाचे व ड्रेनेजसाठी केलेल्या सेफ्टी टँकचे सर्व पाणी घरात येत असल्याने दोन्ही कुटुंबीय त्रस्त होते. बंगला पाडून पुन्हा बांधण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने अखेर हाउस लिफ्टिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी हरियाणातील कंपनीशी करार केला. बंगला उचलण्याचे काम सुरू झाले, मंगळवारी यास ३० दिवस पूर्ण झाले. अडीच फूट बंगला वरती उचलला असून, आता बुधवारी आणखी दीड फूट उंच उचलण्यात येणारआहे. बंगल्याची उंची एकूण ४ फुटांनी वाढणार आहे. संपूर्ण काम आणखी १० दिवसांत पूर्ण होणार आहे. यासाठी बिहारमधील १८ मजूर काम करीत आहेत.  

बंगला कसा उचलतात वर

सर्वप्रथम बंगल्यातील फ्लोरिंग उखडण्यात येते. बंगल्याचा पाया २ फूट खोल खोदण्यात येतो. त्यातील संपूर्ण माती बाहेर काढून टाकण्यात येते.  त्यानंतर फाऊंडेशनचा सिमेंटचा भाग कापण्यात येतो आणि मोकळ्या जागेत जॅक बसविण्यात येतात. त्या जॅकद्वारे हळूहळू सारख्याच अंतराने बंगल्याच्या संपूर्ण भिंती उचलण्यात येतात. एकसमान अंतराने जॅक उचलण्यात येत असल्याने कोणतेही नुकसान होत नाही.  त्यानंतर लोखंडी प्लेट  बसविण्यात येते. त्यात प्रत्येक जॅकमधील मोकळ्या भागात भिंत बांधण्यात येते त्यानंतर एकेक जॅक काढून टाकण्यात येतो व बंगल्याचा संपूर्ण भार नवीन बांधलेल्या फाऊंडेशनवर येतो.  

या भागात ड्रेनेज लाइन नाही. त्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी व पावसाचे पाणी बंगल्यात शिरत असे. नगरसेवक, आमदार, मनपाच्या अधिकाऱ्यांना भेटून फायदा झाला नाही. अखेर हाउस लिफ्टिंगचा पर्याय मिळाला.   - निर्मला गडाप, बंगला मालकीण  

बंगल्याचा आतून पाया खोदताना सुरुवातीला भीती वाटली. संपूर्ण बंगला पडतो की काय? पण, ३० दिवस झाले. बंगल्याची उंची वाढवताना   भिंतींना तडे गेले नाहीत. आता आमचा बंगला चर्चेचा विषय झाला आहे. - अनघा कुलकर्णी,बंगला मालकीण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद