शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

मनमानी वसुली! औरंगाबादहून नागपूरसाठी सांगितले २,४००; प्रत्यक्षात २,७०० ते ३ हजार रु. भाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 14:18 IST

प्रवासी म्हणतात, ‘सणाला गावी जायचे की तक्रार करीत बसायचे’

औरंगाबाद : ‘आरटीओ’ कार्यालयाने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी गुरुवारी विविध मार्गांवरील खासगी बसचे कमाल प्रवासीभाडे निश्चित करण्यात आले. यानुसार औरंगाबाद ते नागपूर बसचे कमाल भाडे २,४०० निश्चित करण्यात आले, प्रत्यक्षात या मार्गासाठी २७०० ते ३ हजार रुपये भाडे आकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालक आरटीओ कार्यालयाच्या भाडेदर निश्चितीला केराची टोपली दाखवीत असल्याची परिस्थिती आहे.

दरवर्षीप्रमाणे ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढीचा दणका दिला आहे. एसटी महामंडळाच्या दीडपट भाडे घेण्याची ट्रॅव्हल्सला मुभा आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक मार्गांवर दुप्पट भाडे आकारण्यात येत आहे. एसटीबरोबरच ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गर्दीच्या हंगामात मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी भाडेआकारणी होत असल्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने बुधवारी ट्रॅव्हल्स चालकांची बैठक घेऊन नियमानुसार भाडे आकारणी करण्याची सूचना केली, तसेच आरटीओ कार्यालयाने खासगी बसचे कमाल प्रवासी भाड्याचे दर निश्चित केले, मात्र, अनेक मार्गांवर निश्चित केलेल्या कमाल दरापेक्षा अधिकचे भाडे आकारण्यात येत आहे.

नियमानुसार भाडे घेण्याची सूचनाट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार भाडे घेण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, या उद्देशाने कमाल भाडेदर निश्चित करण्यात आला आहे. वसूल केलेली जादा रक्कम संबंधित प्रवाशांना परत करावी, अशाही सूचना खासगी प्रवासी वाहतूकदारांना केली आहे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

...तर करा तक्रारअधिक भाडे आकारण्याचा प्रकार होत असेल तर प्रवाशांना आरटीओ कार्यालयात त्यासंदर्भात तक्रार करता येते. मात्र, प्रवासाच्या गडबडीत, नसती कटकट नको म्हणून, बहुतांश प्रवासी अधिक भाडे आकारूनही तक्रार करीत नसल्याची परिस्थिती आहे. सणाला गावी जायचे की तक्रार करीत बसायचे, असा प्रश्न उपस्थित करीत मनमानी भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आरटीओ कार्यालयाने कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली.

‘आरटीओ’ने केलेले खासगी बसचे दर निश्चिती मार्ग.......प्रतिप्रवासी कमाल भाडेऔरंगाबाद - मुंबई : १८०० औरंगाबाद - नागपूर : २४०० औरंगाबाद - चंद्रपूर : २९०० औरंगाबाद - सोलापूर : १५०० औरंगाबाद - लातूर : १३०० औरंगाबाद - पुणे : १२०० औरंगाबाद - कोल्हापूर : २२०० औरंगाबाद - सांगली : २२०० औरंगाबाद - यवतमाळ : १७०० औरंगाबाद - हिंगोली : ११०० (भाडे रुपयांमध्ये)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनDiwaliदिवाळी 2022