शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

छत्रपती संभाजीनगरात २ वर्षांत २४ बिबट्यांचा मृत्यू; आता सोयगावात कुजलेला मृतदेह आढळला

By साहेबराव हिवराळे | Updated: August 16, 2023 14:14 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत एक दोन नव्हे तर मागील दोन वर्षात २४ बिबट्यांच्या मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची लगबग सुरू असताना सोयगाव वन क्षेत्रातील सरकारी गायरानात कुजलेल्या अवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यामुळे वन विभागाची एकाच धांदल उडाली. चारवर्षीय नर बिबट्या नेमका कशाने मृत झाला हे कारण शवविच्छदन आहवालानंतर कळणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, जिल्ह्यात दोन वर्षांत २४ व्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बिबट्या का मरताहेत ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत एक दोन नव्हे तर जिल्ह्यात मागील दोन वर्षात २४ बिबट्याने मृत्यूला कवटाळले आहे. कुणी हेतुपुरस्सर बिबट्या मारतात, काही शिकाराच्या नादात विहीरीत पडून मरतात, काही अत्यावस्थेत बिबट्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान,  सोयगाव परिक्षेत्रांतर्गत मौजे रामपुरा गट नंबर ८१ येथे मंगळवारी (दि.१५) अंदाजे चार वर्ष वयाचा नर बिबट्या मृत्यू झाल्याचे वन कर्मचाऱ्यांना आढळून आले. सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए.पी. मिसाळ यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली तसेच पुढील कार्यवाहीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी कांबळे, दानिक बुखारी, संजू पाटील यांच्या टीमला बोलविण्यात आले. मृत बिबट्या कधी व कशाने मृत झाला याविषयी शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार आहे, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकरणी पुढील तपास वनसंरक्षक एच. जी.धुमाळ,उप वनसंरक्षक एस. व्ही. मंकावार, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रोहिणी साळुंखे (सिल्लोड), वनपरिक्षेत्र अधिकारी ए.पी. मिसाळ (सोयगाव) हे करीत आहेत.

दरम्यान, वैजापूर येथे १२ ऑगस्ट रोजी भुकेने व्याकूळ झालेला बछडा अत्यावस्थेत सापडला होता. या बछडा आता तंदुरूस्त झालेला दिसत आहे. तो पुन्हा कधी अदिवासात जाईल याकडे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागAurangabadऔरंगाबाद