शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वाळूज औद्योगिक परिसरातून २१७ महिला बेपत्ता, एक महिला आढळली थेट पाकिस्तान सीमेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:58 IST

कित्येक प्रकरणात काही दिवस सोबत राहिल्यानंतर प्रियकर महिलांना सोडून पळ काढतो.

- संतोष उगलेवाळूज महानगर : औद्योगिक परिसरातून महिला बेपत्ता होण्याची संख्या मोठी आहे. बेपत्ता होणाऱ्या महिलांमध्ये सर्वाधिक २५ ते ३५ वयोगटातील महिलांचा समावेश आहे. कित्येक प्रकरणात काही दिवस सोबत राहिल्यानंतर प्रियकर महिलांना सोडून पळ काढतो. हे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीतून दिसले.

तरुणांच्या भूलथापांना बळीबेरोजगार तरुण, उद्योगनगरीत कंत्राटदाराच्या मदतीने तुटपुंजा वेतनावर सहज कामावर रुजू होतात. कंपनीत असल्याची बतावणी करून लग्न करतात. लग्नानंतर वाळूजमध्ये दाखल झाल्यावर मुलींना वास्तव कळते. रिकामटेकडे तरुण आमिष, भूलथापा देऊन जवळीक वाढवतात, त्यातून पुढे पळून जाण्याचे प्रकार घडतात.

प्रकरण पहिले : - मुलांकडे पाठ, प्रियकराचा धरला हातपती, दोन मुलांसह राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेचे २३ वर्षीय युवकासोबत सूत जुळले. दोघे पळून गेले. पुढे पोलिसांनी दोघांना पाकिस्तान सीमेजवळून परत आणले. धाय मोकलून रडणाऱ्या दोन्ही मुलांकडे व पतीकडे दुर्लक्ष करून तिने प्रियकरासोबतच राहण्याचा निश्चय केला. हतबल पती मुलांना घेऊन घरी परतला.

प्रकरण दुसरे :- पत्नी पुन्हा पतीकडे परतलीलग्नानंतर पतीसोबत गावाकडून आलेली पत्नी औद्योगिक परिसरात राहत होती. काही महिन्यांतच घरालगत किरायाने राहणाऱ्या तरुणासोबत ती निघून गेली. पुढे काही दिवसांनी तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने पत्नी पतीकडे परतली; परंतु समाजात बदनामी झाल्याने पतीने पत्नीला सांभाळण्यास नकार दिला. सुखी संसाराला एका घटनेमुळे वेगळे वळण लागले. आजही घरातील मोठी मंडळी पतीची समजूत काढत आहेत.

प्रकरण तिसरे :- मुलीवर हलाखीची वेळलग्नाचे आमिष दाखवून विवाहित इसमाने २२ वर्षीय तरुणीला फूस लावून पळवले. आपण अविवाहित असल्याची थाप त्याने मारली होती. वास्तव समजल्यानंतर मुलीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. दुसरीकडे घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने हे पाऊल उचलल्याने घरच्यांनी तिला स्वीकारले नाही. आज मुलीवर हलाखीची वेळ आली आहे.

आकडे बोलतातगेल्या वर्षभरामध्ये तब्बल २१७ महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील १४८ महिला आढळून आल्या आहेत, तर अद्यापही ६९ बेपत्ता महिलांचा शोध सुरू आहे. महिलांनी चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी भविष्याचा विचार करावा, असा सल्ला दीड वर्षापासून ३०० पेक्षा अधिक प्रकरणांचा तपास करणाऱ्या महिला अंमलदार रेखा चांदे या देतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरKidnappingअपहरण