शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाड-पागे समितीचा लाभ घेणारे बोगस २१ जण बडतर्फ; क्लर्कने लाखों रुपये घेऊन केला घोटाळा

By विकास राऊत | Updated: June 7, 2025 19:47 IST

सार्वजनिक बांधकाम : ७, १०, १५ लाख रुपये देऊन मिळविली होती नोकरी

छत्रपती संभाजीनगर : लाड-पागे समितीने चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरती करण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांत बोगसगिरी करून नाेकरी मिळविणाऱ्या २१ जणांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ७, १० व १५ लाख रुपये घेऊन आस्थापना विभागातील काही महाभागांनी नातेवाइकांनाच फसविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची व्याप्ती मराठवाड्यातील प्रत्येक सर्कलपर्यंत असण्याची शक्यता आहे. काही प्रकरणे समोर आल्यानंतर याबाबत चौकशी समिती नेमल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली. यात २१ जणांना बेकायदेशीररीत्या भरती केल्याचे समोर आले.

आस्थापना विभागाचा क्लार्क अंकुश हिवाळेला याप्रकरणात निलंबित केले आहे. कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणात समिती स्थापन केली होती. ज्यांची भरती केली गेली, त्यांनी फसगत झाल्याचे समितीला लेखी दिले. निलंबित क्लार्क हिवाळे याने पैसे घेऊन आम्हाला सेवेत घेतल्याचे अनेकांनी नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या फसवणुकीबाबत कुणीही वाच्यता करण्यास तयार नाही, अशा पद्धतीने अनेक जणांची भरती झाल्याची शक्यता आहे. ७ ते १५ लाखांपर्यंत रक्कम यासाठी घेण्यात आली आहे. विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांनाच गंडविले. सध्या तरी २१ जणांकडून सरासरी १५ लाख घेतले असतील, तर ३ कोटींचा घोटाळा यात दिसत आहे. बांधकाम विभागात सेवेत घेण्यासाठी बडतर्फ कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याकडे रक्कम दिली, त्यांच्या विरोधात त्यांनी पोलिसांकडे धाव घेणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाने या प्रकरणात फक्त निलंबन कारवाई केली असून, अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.

क्लार्क हिवाळेचे निलंबन...काही जणांनी नोकरी मिळाल्यानंतर विवाह केले. आता बडतर्फीच्या कारवाईनंतर त्यांच्यावर वाईट परिस्थिती आली आहे. दोन दिवसांपूर्वी १५ जणांवर कारवाई केली. आस्थापना क्लार्क अंकुश हिवाळेला निलंबित केले आहे.- एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता

असा उघडकीस आला घोटाळा...मराठवाड्याच्या नॅशनल हायवेचे सर्कल ऑफीस येथे आहे. आठही जिल्ह्यांचे ते कार्यालय आहे. निलंबित क्लार्क हिवाळे व इतर कर्मचाऱ्यांनी अपॉइंटमेंट नांदेड, लातूर व इतर जिल्ह्यांत दिली. दोन ते तीन वर्षे नियमित लोकांना काही समजले नाही. ३ वर्षांनंतर बदली केल्यानंतर कर्मचारी भरतीच केलेले नसताना त्यांची बदली इकडे झालीच कशी, असा प्रश्न येथील वरिष्ठांना पडला. एकावरून अनेक कर्मचारी बोगस भरती झाल्याचे समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर लाड-पागे समितीच्या नावाने बोगस भरती केल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsuspensionनिलंबन